IND vs SA 3rd ODI South Africa 270 All Out Kuldeep Yadav Prasidh Krishna Picks Four Wickets Each : कुलदीप यादवच्या फिरकीतील जादू आणि प्रसिद्ध कृष्णाच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला २७० धावांत ऑलआउट केले आहे. विशाखापट्टणमच्या मैदानात पहिल्या षटकात पहिली विकेट गमावल्यावर क्विंटन डी कॉक आणि टेम्बा बावुमानं शतकी भागीदारी केली. सलामीवीर क्विंटन डी कॉकनं शतकासह टेम्बा बावुमाच्या उपयुक्त ४८ धावांच्या खेळीशिवाय अन्य कुणालाही भारतीय गोलंदाजांनी फार काळ टिकू दिले नाही. भारताकडून कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा दोघांनी प्रत्येकी ४-४ विकेट्स घेतल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय संघानं टॉस जिंकला अन् गोलंदाजी करताना पहिल्या षटकातच दक्षिण आफ्रिकेला दिला पहिला धक्का
दोन वर्षे आणि २० वनडे सामन्यानंतर नाणेफेक जिंकून लोकेश राहुलनं मालिकेतील निर्णायक सामन्यात पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच षटकात अर्शदीप सिंगनं कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत रायन रिकल्टनला खातेही न उघडता माघारी धाडले. पण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं संयम दाखवत मॅचमध्ये कमबॅक केले.
IND vs SA : क्विंटन डी कॉकचं विक्रमी शतक; जयसूर्याची बरोबरी अन् याबाबतीत कोहलीच्या किंचित पुढे
क्विंटन डी कॉक- टेम्बा बावुमा जोडीची शतकी भागीदारी, पण...
पहिल्याच षटकात पहिली विकेट गमावल्यावर क्विंटन डी कॉक आणि कर्णधार टेम्बा बावुमा या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. ही जोडी डोकेदुखी ठरतीये असे वाटत असताना जड्डूनं टेम्बा बावुमाला ४८ धावांवर तंबूत धाडले. दुसऱ्या बाजूला क्विंटन डी कॉकनं शतक साजरे केले. पण त्यानंत प्रसिद्ध कृष्णानं त्याला लगेच तंबूत धाडले. कुलदीप यादवनं डेवॉल्ड ब्रेविस २९ (२९), मार्को यान्सेन १७ (१५) आणि कॉर्बिन बॉश ९ (१२) या घातक फलंदाजांसह लुंगी एनगिडीच्या रुपात ४ विकेट्सचा डाव साधला. पहिल्या दोन वनडेत स्फोटक बॅटिंगचा नजराणा पेश करणाऱ्यांना भारतीय गोलंदाजांनी स्वस्तात माघारी धाडल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ५० षटकेही खेळता आली नाहीत. दक्षिण आफ्रिका संघ ४७.५ षटकात २७० धावांत आटोपल्यामुळे भारतीय संघाला सामन्यासह मालिका जिंकण्यासाठी २७१ धावांचे टार्गेट मिळाले आहे.