Join us

Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!

India beat South Africa: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात जेमिमा रॉड्रिग्जने ऐतिहासिक शतक झळकावले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 19:00 IST

Open in App

तिरंगी मालिकेतील पाचव्या सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा २३ धावांनी पराभव केला. भारताच्या विजयात जेमिमा रॉड्रिग्जचा सिंहाचा वाटा आहे, तिने ८९ चेंडूत शतक झळकावून संघाची धावसंख्या ३०० पार नेली. याशिवाय, भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावणारी ती तिसरी फलंदाज ठरली. या कामगिरीबद्दल भारतीयांकडून तिचे कौतुक केले जात आहे.

भारताकडून महिला क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम स्मृती मानधनाच्या नावावर आहे. यावर्षी तिने आयर्लंडविरुद्ध ७० चेंडूत शतक पूर्ण केले. त्यानंतर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. हरमनप्रीतने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात ८९ चेंडूत शतक झळकावले. आता जेमिमा रॉड्रिग्ज ८९ चेंडूत शतक झळकावून शतक झळकावणारी भारताची तिसरी सर्वात जलद महिला फलंदाज ठरली.

भारतासाठी महिला क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम स्मृती मानधनाच्या नावावर आहे. या वर्षी त्याने आयर्लंडविरुद्ध ७० चेंडूत शतक पूर्ण केले. दुसरे सर्वात जलद शतक ठोकण्याचा पराक्रम हरमनप्रीत कौरने केला. २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने ८७ चेंडूत शतक झळकावले. आता जेमिमा रॉड्रिग्ज एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद झळकावणारी तिसरी भारतीय ठरली.

भारतासाठी सर्वात जलद एकदिवसीय शतकस्मृती मानधना विरुद्ध आयर्लंड (२०२५)- ७० चेंडूहरमनप्रीत कौर विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२०२४)- ८७ चेंडूजेमिमा रॉड्रिग्ज विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२०२५)- ८९ चेंडूहरमनप्रीत कौर विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०१७)- ९० चेंडू जेमिमा रॉड्रिग्ज विरुद्ध आयर्लंड (२०२५)- ९० चेंडू

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाजेमिमा रॉड्रिग्ज