तिरंगी मालिकेतील पाचव्या सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा २३ धावांनी पराभव केला. भारताच्या विजयात जेमिमा रॉड्रिग्जचा सिंहाचा वाटा आहे, तिने ८९ चेंडूत शतक झळकावून संघाची धावसंख्या ३०० पार नेली. याशिवाय, भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावणारी ती तिसरी फलंदाज ठरली. या कामगिरीबद्दल भारतीयांकडून तिचे कौतुक केले जात आहे.
भारताकडून महिला क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम स्मृती मानधनाच्या नावावर आहे. यावर्षी तिने आयर्लंडविरुद्ध ७० चेंडूत शतक पूर्ण केले. त्यानंतर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. हरमनप्रीतने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात ८९ चेंडूत शतक झळकावले. आता जेमिमा रॉड्रिग्ज ८९ चेंडूत शतक झळकावून शतक झळकावणारी भारताची तिसरी सर्वात जलद महिला फलंदाज ठरली.
भारतासाठी महिला क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम स्मृती मानधनाच्या नावावर आहे. या वर्षी त्याने आयर्लंडविरुद्ध ७० चेंडूत शतक पूर्ण केले. दुसरे सर्वात जलद शतक ठोकण्याचा पराक्रम हरमनप्रीत कौरने केला. २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने ८७ चेंडूत शतक झळकावले. आता जेमिमा रॉड्रिग्ज एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद झळकावणारी तिसरी भारतीय ठरली.
भारतासाठी सर्वात जलद एकदिवसीय शतक
स्मृती मानधना विरुद्ध आयर्लंड (२०२५)- ७० चेंडू
हरमनप्रीत कौर विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२०२४)- ८७ चेंडू
जेमिमा रॉड्रिग्ज विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२०२५)- ८९ चेंडू
हरमनप्रीत कौर विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०१७)- ९० चेंडू
जेमिमा रॉड्रिग्ज विरुद्ध आयर्लंड (२०२५)- ९० चेंडू
Web Title: IND vs SA: India beat South Africa by 23 runs, Jemimah Rodrigues Joins Elite List After Hitting 2nd ODI Hundred
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.