IND vs SA ICC T20 World Cup 2026 Super 8 Match Jasprit Bumrah Strikes vs Quinton de Kock : टी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेतील दोन फायनलिस्ट अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुपर ८ फेरीतील पहिल्या लढतीसाठी मैदानात उतरले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा कर्णधार मार्करम याने या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघासाठी हे एक आव्हानच होते. कारण यंदाच्या हंगामात आतापर्यंत भारतीय संघाने सर्व सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी केली आहे. पण जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांनी पॉवर प्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेचा डाव हाणून पाडला. जसप्रीत बुमराहनं आपल्या पहिल्याच षटकात क्विंटन डी कॉकच्या रुपात संघाला पहिले यश मिळून दिले. त्यानंतर अर्शदीपनं पुढच्या षटकात मार्करमला तंबूचा रस्ता दाखवला. दुसऱ्या षटकात बुमराहनं रायन रिकल्टनला तंबूचा दाखवत आपल्या खात्यात दुसरी विकेट जमा करताना दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का दिला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
बुमराहनं पहिल्या षटकातच घेतली क्विंटन डी कॉकची विकेट, इथं पाहा व्हिडिओ
नाणेफेक जिंकल्यावर फलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर क्विंटन डी कॉक आणि मार्करम जोडीनं दक्षिण आफ्रिकेच्या डावाला सुरुवात केली. अर्शदीप सिंगनं भारताकडून पहिले षटक टाकले. पहिल्या षटकात फक्त ४ धावा आल्या. दुसरे षटक घेऊन आलेल्या बुमराहच्या गोलंदाजीवर चौथ्या चेंडूवर क्विंटन डी कॉकनं एक खणखणीत चौकार मारला. पुढच्या चेंडूवर बुमराहनं अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या डावखुऱ्या फलंदाजाला क्लीन बोल्ड केले.
पॉवरप्लेमध्येच दक्षिण आफ्रिकेनं गमावल्या तीन विकेट्स
पुढच्या षटकात अर्शदीपनं मार्करमच्या रुपात दुसऱ्या सलामीवीरालाही माघारी धाडले. मार्करम हार्दिक पांड्याच्या हाती झेल देऊन परतला. पहिल्या दोन विकेट्स पडल्यावर रायन रिकल्टन याने आक्रमक अंदाजात आपल्या खेळीची सुरुवात केली. त्याच्या बॅटमधून अर्शदीपच्या गोलंदाजीवर एक उत्तुंग षटकारही पाहायला मिळाला. पण बुमराहने आपल्या स्पेलमधील दुसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर त्याला बाद केले. बुमराहनं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये घेतलेल्या दोन विकेट्सच्या जोरावर टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा द. आफ्रिकेचा डाव चांगलाच फसला. बुमराहला अर्शदीपची साथ मिळाल्यामुळे पॉवर प्लेेमध्ये दक्षिण आफ्रिकेनं ४१ धावांत आघाडी फळीतील तीन विकेट्स गमावल्या.