India vs South Africa, 43rd Match, Super 8 Group 1 : भारतीय संघ टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८ मधील पहिल्या लढतीसाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उतरला आहे. या सामन्यात नाणेफेकीवेळीच दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने सूर्याला चॅलेंज दिल्याचे पाहायला मिळाले. नाणेफेक जिंकून त्याने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
भारतीय संघाने यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत प्रत्येक सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी केली आहे. त्यामुळे या सामन्यात टॉस वेळीच टीम इंडियाला धावांचा पाठलाग करण्याचे नवे आव्हान मिळाले आहे. नाणफेक जिंकली असती तर पहिल्यांदा फलंदाजी करण्यालाच पसंती दिली असती, ही गोष्ट भारतीय कर्णधाराने बोलून दाखवली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचं आव्हान भेदत टीम इंडिया विजयी रुबाब कायम ठेवणार का? ते पाहण्याजोगे असेल.
महत्त्वाच्या सामन्यातही उप कर्णधार बाकावरच
धावांसाठी संघर्ष करणारा अभिषेक शर्मा प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार, हे सूर्यकुमार यादवनं मॅचआधीच्या प्रेस कॉन्फरन्समध्येच स्पष्ट केले होते. पण या सामन्यात उप कर्णधार अक्षर पटेलला संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. पण टॅक्टिकवर जोर देत संघ कोणत्याही बदलाशिवाय मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट करताना वॉशिंग्टन सुंदरचं संघातील स्थान कायम असल्याचे सूर्यानं स्पष्ट केले.
भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन :
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन :
एडन मार्कराम (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रेव्हिस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को यान्सेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी
Web Summary : South Africa chose to bat first after winning the toss, challenging India to chase. Suryakumar Yadav would have also batted first. Will India overcome this challenge?
Web Summary : दक्षिण अफ्रीका ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला किया, भारत को पीछा करने की चुनौती दी। सूर्यकुमार यादव भी पहले बल्लेबाजी करते। क्या भारत इस चुनौती को पार कर पाएगा?