IND vs SA Rishabh Pant After India 2-0 At Home Test Loss : गुवाहाटीच्या मैदानात भारतीय संघाला कसोटी क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यातील ४०८ धावांनी विजय मिळवत पाहुण्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २५ वर्षानंतर भारतीय मैदानात आपलं वर्चस्व दाखवून दिलं. कसोटी मालिकेतील दोन्ही सामन्यात एका बाजूला दक्षिण आफ्रिकेच्या संघाने बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली. याउलट चित्र भारतीय संघाबाबत घडलं. मैदानासोबत खेळपट्टीचा मिजास बदलला पण टीम इंडियाचा फ्लॉप शोचा सिलसिला कायम राहिला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
घरच्या मैदानातील लाजिरवाण्या पराभवावर काय म्हणाला पंत?
भारतीय संघाच्या पराभवानंतर रिषभ पंत याने दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सर्वोत्तम खेळ दाखवला आणि आम्ही प्रत्येक वेळी कमी पडलो हे मान्य केले. सामन्यानंतर भारतीय कसोटी संघाचा कार्यवाहू कर्णधार पंत म्हणाला की, ' हा पराभव निराशाजनक आहे. सांघिक कामगिरी आणखी चांगली करण्याची गरज होती. प्रतिस्पर्ध्यांना उत्तम खेळ केला. या विजयाचे श्रेय त्यांना द्यायलाच पाहिजे. आम्हाला मानसिकृष्ट्या आणखी स्पष्टतेसह मैदानात उतरण्याची गरज होती. या पराभवातून खूप काही शिकायला मिळाले. त्यांनी मालिकेत पूर्ण वर्चस्व गाजवलं, पण तुम्ही क्रिकेटला कधीही गृहीत धरू शकत नाही. आपण घरच्या मैदानावर खेळत होतो आणि काही क्षणी आपण सामन्यात पुढेही होतो. संधी मिळाल्या, पण संधीच सोन करता आल नाही. त्याची मोठी किंमत संपूर्ण मालिकेत मोजावी लागली, असे पंत म्हणाला आहे.