Rishabh Pant Record Most Sixes In Tests For India : भारतीय संघाचा स्टार विकेट किपर बॅटर आणि उप कर्णधार रिषभ पंत याने ईडन गार्डन्सच्या ऐतिहासिक मैदानात नवा इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाच्या खेळात पंतनं २ चौकार आणि २ षटाकारांच्या मदतीने फक्त २७ धावांची खेळी केली. पण या खेळीतील दोन उत्तुंग षटकारासह पंत टीम इंडियातील टेस्टमधील बिग हिटरच्या यादीत टॉपला पोहचला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पंतन मोडला सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातील भारताच्या पहिल्या डावातील ३८ व्या षटकात पंतनं केशव महाराज याच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार मारला. या षटकारासह त्याने वीरेंद्र सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडीत काढला. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आता रिषभ पंतच्या नावे झाला आहे.
IND vs SA : बुमराहच्या 'स्टंप-माइक' कमेंटवर दक्षिण आफ्रिकेनं स्पष्ट केली भूमिका! कोच म्हणाले आम्ही…
क्रिकेट जगतात बेन स्टोक्सच्या नावे आहे सर्वाधिक सिक्सरचा रेकॉर्ड
वीरेंद्र सेहवाग याने आपल्या कसोटी कारकिर्दीत ९० षटकार मारल्याचा रेकॉर्ड होता. हा विक्रम मोडत रिषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. पंत हा कसोटीतही टी-२० स्टाइलमध्ये फटकेबाजी करत चाहत्यांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी फटकेबाजी करण्यात माहिर आहे. क्रिकेट जगतात कसोटीत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा बेन स्टोक्स १३६ षटकारांसह टॉपला आहे. येत्या काळात पंत हा विक्रमही आपल्या नावे करू शकतो.
कसोटीत भारताकडून सर्वाधिक षटकार मारणारे ५ फलंदाज
- रिषभ पंत - ९२*
- वीरेंद्र सेहवाग - ९०
- रोहित शर्मा - ८८
- रवींद्र जडेजा - ८०
- एमएस धोनी - ७८
फक्त तिघांनीच पार केला आहे शंभरीचा आकडा
कसोटी क्रिकेटमध्ये फक्त तीन फलंदाजांनीच शंभरहून अधिक षटकार मारले आहेत. यात बेन स्टोक्स १३६ षटकारांसह अव्वलस्थानी आहे. त्याच्यापाठोपाठ न्यूझीलंडचा ब्रँडन मॅक्युलम १०७ षटकारांसह दुसऱ्या तर ऑस्ट्रेलियाचा विकेट किपर बॅटरॲडम गिलख्रिस्ट १०० षटकारांसह तिसऱ्या स्थानी आहे.