Join us
Daily Top 2Weekly Top 5

T20 World Cup स्पर्धेत कसा आहे IND vs SA यांच्यातील Head To Head Record? जाणून घ्या सविस्तर

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत किती सामने खेळवण्यात आले? यात कोण भारी ठरले? यासंदर्भातील खास रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 18:43 IST

Open in App

ICC Men's T20 World Cup 2026, IND vs SA  Head To Head Record : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारती संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीनं सुपर ८ फेरीतील लढतींना सुरुवात करणार आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघ कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. दोन्ही संघ गत हंगामातील फायनलिस्ट असल्यामुळे अहदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील लढत रोमहर्षक होईल, अशी अपेक्षा आहे. इथं एक नजर टाकुयात टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत किती सामने खेळवण्यात आले? यात कोण भारी ठरले? यासंदर्भातील खास रेकॉर्ड

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा! 

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० वर्ल्ड कप मधील हेड टू हेड रेकॉर्ड

टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात भारतीय संघाचा  दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रेकॉर्ड एकदम जबरदस्त राहिला आहे. आतापर्यंत दोन्ही संघ ७ वेळा समोरासमोर आले आहेत. यात ५ सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली असून फक्त दोन वेळा दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवता आला आहे. हे आकडे भारतीय संघाची जमेची बाजू ठरतील. पण आपल्या गटात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अपराजित राहून सुपर ८ गाठली असल्यामुळे भारतीय संघ त्यांना  हलक्यात घेणार नाही, हेही तितकेच खरे आहे. सुपर ८ मधील एक पराभव संघाच्या सेमीच्या आशा धुसर करू शकतो. त्यामुळे दोन्ही संघ ताकदीनं मैदानात उतरतील.

स्मृती-जेमीचा जलवा अन् श्रेयंकाच्या गोलंदाजीतील ब्युटी! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकत रचला इतिहास ...

कधी कुणी किती फरकाने मारली बाजी? 

  • २००७ – भारत ३७ धावांनी विजयी
  • २००९ – दक्षिण आफ्रिका १२ धावांनी विजयी
  • २०१० – भारत १४ धावांनी विजयी
  • २०१२ – भारत एक धावेनं विजयी
  • २०१४ – भारत ६ विकेट्सनी विजयी
  • २०२२ – दक्षिण आफ्रिका ५ विकेट्सनी विजयी
  • २०२४ – भारत ७ धावांनी विजयी

अहमदाबादच्या मैदानातही भारतानेच मारलीये बाजी

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत फक्त एकच आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळवण्यात आला आहे. गतवर्षी दोन्ही संघात झालेल्या लढतीत भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २३१ धावा करत दक्षिण आफ्रिकेसमोर २३२ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा  संघ २०१ धावांपर्यंतच मज मारू शकला होता.  

English
हिंदी सारांश
Web Title : IND vs SA T20 World Cup: Head-to-head record detailed analysis.

Web Summary : India dominates South Africa in T20 World Cups, winning 5 of 7 matches. India beat South Africa by 7 runs in the most recent match of 2024. In Ahmedabad, India set a target of 232 and won by 30 runs in the only T20 played at the stadium.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाभारतीय क्रिकेट संघ