IND vs SA Guwahati Test Match Barsapara Pitch Report : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना गुवाहाटीच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. कोलकात्यातील पराभवानंतर खेळपट्टीची चर्चा चांगलीच गाजली. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत खेळाडूं इतकंच लक्ष गुवाहाटीच्या खेळपट्टीवरही असेल. कोणत्याही सामन्याआधी खेळपट्टीचा अंदाज वर्तवणे खूपच कठीण काम असते. इथं जाणून घेऊयात दुसऱ्या सामन्यात खेळपट्टी कशी खेळेल? यासंदर्भातील अंदाजावरील खास रिपोर्ट...
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
या गोष्टीमुळं खेळपट्टीचा अंदाज बांधणं 'मुश्किल'च
गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर पहिल्यांदाच कसोटी सामना रंगणार आहे. या मैदानात आतापर्यंत ६ आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात आले आहेत. ज्यात २ वनडे आणि४ टी २० सामन्यांचा समावेश आहे. त्यामुळे खेळपट्टीचा अंदाज बांधणं कठीण आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवरील खेळपट्टी ही काळ्या मातीने तयार करण्यात आली होती. याउलट गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवरील खेळपट्टी तयार करण्यासाठी लाल मातीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर गती आणि उसळी घेणारे चेंडू पाहायला मिळतील, अशी अपेक्षा आहे.
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
गुवाहटीत दिसू शकतो मुंबईचा पॅटर्न!
मुंबईच्या वानखेडेची खेळपट्टीही लाल मातीची असते. इथं २ दिवस फलंदाजांना तर त्यानंतर फिरकीचा जलवा पाहायला मिळतो. गुवाहटीच्या मैदानातही तेच चित्र पाहायला मिळू शकते. बारसापाराच्या मैदानातील खेळपट्टीवर सुरुवातीला फलंदाजांना धावा करणं सोपे जाईल, अशी अपेक्षा आहे. जस जसा खेळ पुढे जाईल तशी ही खेळपट्टी फिरकीच्या बाजूनं झुकेल. त्यामुळे चौथ्या डावात धावांचा पाठलाग करणं आव्हानात्मक ठरू शकते.
कसोटीत पहिल्यांदाच असं घडणार?
गुवाहाटीच्या मैदानातील सामना हा पहिल्या कसोटी सामन्याच्या तुलनेत अर्धा तास लवकर सुरु होणार आहे. साडे आठ वाजता दोन्ही संघातील कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील. शुभमन गिल स्पर्धेतून बाहेर पडला असून रिषभ पंत भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी घेतली तर त्यात नवल वाटण्याजोगे काही नसेल. या सामन्यात सकाळी ९ वाजता पहिला चेंडू टाकला जाईल. या कसोटी सामन्यात पहिल्यांदा टी ब्रेक आणि त्यानंतर लंच ब्रेक असा बदल करण्यात आला आहे. हे नियोजन शक्यतो पिंक बॉल टेस्टमध्ये पाहायला मिळते. गुवाहाटीच्या हवामानामुळे पहिल्यांदात भारतीय मैदानात ही गोष्ट पाहायला मिळेल.