Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs SA 2nd Test : MS धोनीच्या एलिट क्लबमध्ये सामील होणार रिषभ पंत! जाणून घ्या त्याचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड!

गुवाहाटीत पहिला कसोटी सामना, पंत पहिल्यांदाच करताना दिसेल कसोटी संघाचे नेतृत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 11:30 IST

Open in App

IND vs SA Guwahati 2nd Test Match Rishabh Pant Captaincy Record  : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. पाहुण्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कोलकाताचं मैदान मारत मालिकेत १-० अशी आघाडी घेतील असून भारतीय संघ दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. २२ नोव्हेंबर पासून रंगणाऱ्या दुसऱ्या सामन्यात शुभमन गिलच्या अनुपस्थितीत रिषभ पंत भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल. इथं एक नजर टाकुयात कसा आहे रिषभ पतंचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड त्यासंदर्भातील सविस्तर माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पंतने आतापर्यंत ५ आंतरराष्ट्रीय सामन्यांत केलं आहे टीम इंडियाचे नेतृत्व

रिषभ पंत हा क्रिकेट जगतातील सर्वोत्तम विकेट किपर बॅटर आहे. इंग्लंड दौऱ्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपासून त्याच्या खांद्यावर संघाच्या उप कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे शुभमन गिलच्या अनुपस्थितीत त्याच्याकडे आपोआप नेतृत्व येईल. आतापर्यंत त्याने ५ आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. पण ते सर्व सामने टी-२० फॉरमॅटमधील आहेत. यातील २ सामन्यात पराभव आणि २ सामन्यातील विजयासह एक सामना रद्द झाला होता.

IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद

गुवाहाटीत पहिला कसोटी सामना, पंत पहिल्यांदाच करताना दिसेल कसोटी संघाचे नेतृत्व

गुवाहाटीच्या मैदानात पहिल्यांदाच कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात रिषभ पंत पहिल्यांदाच भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करताना दिसेल. MS धोनीनंतर भारतीय संघाचे नेतृत्व करणारा तो दुसरा विकेट किपर बॅटर ठरेल. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने २०१७-१८ च्या हंगामात रणजी करंडक स्पर्धेत त्याने ५ सामन्यात दिल्ली संघाचे नेतृत्व केले होते. यापैकी २ विजय आणि २ अनिर्णित सामन्यासह एक सामन्यात संघाला पराभव स्विकारावा लागला होता.  

कोलकाताच्या मैदानात कार्यवाहू कर्णधार असताना पराभव

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कोलकाता कसोटी सामन्यात शुभमन गिल याने मानेच्या दुखापतीमुळे मैदान सोडल्यावर रिषभ पंतनेच संघाचे नेतृत्व केले होते. गिलच्या तुलनेत बॅटिंगप्रमाणेच त्याच्या कॅप्टन्सीत आक्रमक अंदाज पाहायला मिळाला. पहिल्या डावात भारतीय संघाने अल्प आघाडीही घेतली. पण सरशेवटी संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता दुसऱ्या सामन्यात तो कॅप्टन्सीची छाप सोडत संघाला कमबॅक करून देण्यात यशस्वी ठरणार का? याकडेही सर्वांच्या नजरा असतील.

English
हिंदी सारांश
Web Title : Rishabh Pant to potentially join Dhoni as captain in 2nd Test.

Web Summary : Rishabh Pant may lead India in the second Test against South Africa, following Shubman Gill's absence. He has captained in T20s but will lead the Test team for the first time in Guwahati, potentially joining MS Dhoni as a wicket-keeper captain.
टॅग्स :दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारिषभ पंतशुभमन गिलमहेंद्रसिंग धोनीभारतीय क्रिकेट संघ