Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs SA : रोहित, विराटला वन डे आणि ट्वेंटी-२० संघात का संधी नाही? BCCIनं सांगितल कारण

भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार असून तिथे वन डे, ट्वेंटी-२० आणि कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 20:40 IST

Open in App

india tour south africa : आगामी काळात भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार असून तिथे वन डे, ट्वेंटी-२० आणि कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. १० डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून, टीम इंडिया तीन फॉरमॅटसाठी तीन वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात असणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) गुरूवारी आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली. लक्षणीय बाब म्हणजे अनेक नव्या चेहऱ्यांना आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. मात्र, भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना वन डे आणि ट्वेंटी-२० संघातून वगळण्यात आले आहे. 

दरम्यान, रोहित आणि विराट यांनी व्हाइट बॉल क्रिकेटमधून विश्रांती मागितली असल्याकारणाने त्यांना वगळण्यात आले असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. भारतीय संघ जाहीर करताना बीसीसीआयने याबाबत एक पोस्ट करत माहिती दिली.

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भारताचा कसोटी संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, लोकेश राहुल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा. 

भारतचा वन डे संघ -

लोकेश राहुल (कर्णधार), युझवेंद्र चहल, रिंकू सिंग, संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजित पाटीदार, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि दीपक चहर. 

भारताचा ट्वेंटी-२० संघ -

सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन, जितेश शर्मा, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.

ट्वेंटी-२० मालिका 

१० डिसेंबर - डर्बन, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून१२ डिसेंबर - जीकबेर्हा, रात्री ८.३० वाजल्यापासून१४ डिसेंबर - जोहान्सबर्ग, रात्री ८.३० वाजल्यापासून

वन डे मालिका१७ डिसेंबर - जोहान्सबर्ग, दुपारी १.३० वाजल्यापासून१९ डिसेंबर - जीकबेर्हा, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून २१ डिसेंबर - पर्ल, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून

कसोटी मालिका२६ ते ३० डिसेंबर - दुपारी १.३० वाजल्यापासून३ ते ७ जानेवारी - दुपारी १.३० वाजल्यापासून

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारोहित शर्माविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय