Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs SA : मार्करमचा मोठा पराक्रम! दशकभर 'अजिंक्य' राहिलेला रहाणेचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला!

अजिंक्य रहाणेचा १० वर्षांपासून अबाधित असणारा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 22:08 IST

Open in App

Aiden Markram Breaks Ajinkya Rahanes World Record Of Taking Most Catches : ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन दक्षिण आफ्रिकेच्या संघासह या ताफ्यातील स्टार खेळाडू एडन मार्करम याने गुवाहाटी कसोटी सामन्यात विश्वविक्रमाला गवसणी घातली. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात हवेत उडी मारून नितीश कुमार रेड्डीचा कमालीची झेल टिपणाऱ्या मार्करम याने दुसऱ्या डावात एका कसोटी सामन्यात सर्वाधिक झेल घेत विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

अजिंक्य रहाणेचा १० वर्षांपासून अबाधित असणारा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

कसोटी क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक झेल टिपण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड या आधी अजिंक्य रहाणेच्या नावे होता. २०१५ साली श्रीलंकेविरुद्धच्या गॉले कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणे याने एका सामन्यात ८ झेल टिपले होते. गुवाहाटी कसोटीत दुसऱ्या डावात वॉशिंग्टन सुंदरचा अप्रतिम झेल टिपत मार्करम याने १० वर्षांपासून अबाधित असलेला अजिंक्य रहाणेचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे.

Temba Bavuma : आधी 'चोकर्स'चा टॅग पुसला! आता जे कुणाला नाही जमलं ते करुन दाखवत नवा इतिहास रचलाएका कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षकाच्या रुपात सर्वाधिक झेल टिपणारे खेळाडू

  • एडन मार्करम विरुद्ध भारत - ९ झेल, गुवाहाटी, २०२५ 
  • अजिंक्‍य रहाणे विरुद्ध श्रीलंका - ८ झेल, गॉल, २०१५
  • ग्रेग चॅपल विरुद्ध इंग्‍लंड - ७ झेल, वाका, १९७४
  • यजुर्विंद्र सिंग विरुद्ध इंग्‍लंड - ७ झेल, बंगळुरु, १९७७
  • तिलकरत्‍ने दिलशान विरुद्ध न्‍यूझीलंड - ७ झेल, कोलंबो (एसएससी), १९९२ 

१३१ वर्षांनी आफ्रिकेच्या खेळाडूनं क्षेत्ररक्षणात सोडली खास छाप

दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून एका कसोटी सामन्यात सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम याआधी एई वोगलर या दिग्गजाच्या नावे होता. १९१० मध्ये डरबन कसोटीत इंग्लंडविरुद्ध या खेळाडूनं एका सामन्यात ६ झेल टिपले होते. १३६ वर्षांनी हा विक्रम मोडीत काढत मार्करम वर्ल्ड नंबर वन बनला आहे.  ब्रूस मिचेल (१९३१), जॅक कॅलिस (२०१२), ग्रीम स्मिथ (२०१२) आणि डेविड बेडिंघम (२०२५) यांनी वोगलर यांच्या विक्रमाशी बरोबरीचा डाव साधला. पण मार्करमनं एकाच सामन्यात या सर्वांना मागे टाकत वर्ल्ड रेकॉर्डसह नवा इतिहास रचला.

English
हिंदी सारांश
Web Title : Markram Breaks Rahane's World Record with Most Catches in Test!

Web Summary : Aiden Markram set a new world record, surpassing Ajinkya Rahane, by taking nine catches in a single Test match against India in Guwahati. He broke a 10-year-old record. This feat makes him the South African player with the most catches in a Test, after 131 years.
टॅग्स :दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाअजिंक्य रहाणेभारतीय क्रिकेट संघ