तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्याच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर भारतीय संघाने पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर धावांचा डोंगर उभारला आहे. दहाव्यांदा भारतीय संघाने टी-२० मध्ये २०० पेक्षा अधिक धावसंख्या उभारत आपलाच रेकॉर्ड भक्कम केल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ५ बाद २३१ धावा करत पाहुण्या दक्षिण आफ्रिकेसमोर २३२ धावांचे मोठे टार्गेट सेट केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अभिषेक शर्मा आणि संजूची दमदार सलामी
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन जोडीनं संघला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ३४ चेंडूत ६३ धावांची भागीदारी रचेली. अभिषेक शर्मा २१ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकार ठोकून ३४ धावांवर बाद झाला. संजू सॅमसन याने २२ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत ३७ धावांचे योगदान दिले.
VIDEO : संजूचा पॉवरफुल फटका! चेंडू लागल्यामुळे अंपायरवर इंज्युरी ब्रेक घेण्याची वेळ! नेमकं काय घडलं?
तिलक वर्माहार्दिक पांड्याची तुफान फटकेबाजी
कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा अपयशी ठरल्यावर तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु धु धुतलं. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ४४ चेंडूत १०५ धावांची दमदार भागीदारी रचली. तिलक वर्मानं ४२ चेंडूत १० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ७३ धावांची खेळी केली. हार्दिक पांड्याने भारताकडून दुसऱ्या क्रमांकाचे जलद अर्धशतक झळकावताना २५ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६३ धावा केल्या.