Join us

IND vs SA 5th T20I Live Updates : टीम इंडियाच्या मदतीला पाऊस धावला; इशान किशनचा 'संथ' चेंडूवर त्रिफळा उडाला, Video 

India vs South Africa 5th T20I Live Updates : पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात भारताला साजेशी सुरुवात करता आलेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 20:23 IST

Open in App

India vs South Africa 5th T20I Live Updates : पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात भारताला साजेशी सुरुवात करता आलेली नाही. इशान किशनने ( ishan kishan) पहिल्या षटकात दोन षटकारांसह १६ धावा केल्या, परंतु दुसऱ्या षटकात लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर त्याचा त्रिफळा उडाला. ऋतुराज गायकवाड पुन्हा अपयशी ठरला आणि भारताला २७ धावांत २ धक्के बसले. त्यानंतर पुन्हा पावसाने एन्ट्री घेतलीय.

पावसामुळे ५० मिनिटे उशीरा  सुरू झालेला सामना प्रत्येकी १९-१९ षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. केशव महाराजने टाकलेल्या पहिल्याच षटकात इशान किशनने दोन षटकारांसह १६ धावा कुटल्या. आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे हे होम ग्राऊंड असल्यामुळे येथे RCB, RCB नावाच्या घोषणा होत होत्या. या मालिकेत २००+धावा करणारा इशान हा पहिलाच फलंदाज ठरला. पण, लुंगी एनगिडीने दुसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर भारताला धक्का दिला.

एनगिडीने टाकलेला स्लोव्ह यॉर्कर खेळण्यास इशान चुकला अन् त्याचा त्रिफळा उडाला. ७ चेंडूंत १५ धावा करून तो माघारी परतला. ऋतुराजकडून आज मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु तोही चौथ्या षटकात एनगिडीच्या स्लोव्ह चेंडूवर फसला अन् १० धावांवर झेल देऊन माघारी परतला. भारताचे दोन्ही सलामीवीर २७ धावांत तंबूत परतले.

०-२ अशा पिछाडीवरून मुसंडी मारताना भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्घची मालिका २-२ अशी बरोबरीत आणली. भारताने तिसरी व चौथी लढत जिंकून मालिकेतील चुरस अधिक वाढवली. पाचवा व अंतिम सामना आज बंगळुरू येथे खेळवण्यात येणार आहे आणि तो जिंकल्यास आफ्रिकेविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका जिंकणारा रिषभ पंत ( Rishabh Pant) हा पहिला भारतीय कर्णधार ठरणार आहे. यापूर्वी विराट कोहली व महेंद्रसिंग धोनी यांनाही असा पराक्रम करता आलेला नाही. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा ( Temba Bavuma) याला चौथ्या सामन्यात दुखापत झाली होती.  केशव महाराज आज दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व सांभाळत आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाइशान किशनऋतुराज गायकवाड
Open in App