Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी

हार्दिक पांड्याची तुफान फटकेबाजी; अवघ्या १६ चेंडूत साजरे केले अर्धशतक अन्....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 21:41 IST2025-12-19T21:34:49+5:302025-12-19T21:41:17+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs SA 5th T20I Hardik Pandya Smashes Second Fastest T20I Fifty By An Indian After Yuvraj Singh | Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी

Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी

Hardik Pandya Smashes Second Fastest T20I Fifty By An Indian : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यात हार्दिक पांड्याचा हार्ड हिटिंग शो पाहायला मिळाला. तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करताना पांड्याने अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक साजरे केले. या खेळीसह आंतरारष्ट्रीय टी-२० मध्ये भारताकडून सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. २००७ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत युवराज सिंगनं इंग्लंड विरुद्ध फक्त १२ चेंडूत अर्धशकाला गवसणी घातली होती. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

भारताकडून सर्वात जलदगतीने अर्धशतक झळकावणारे फलंदाज

  • १२ चेंडू- युवराज सिंग विरुद्ध इंग्लंड (डरबन, २००७)
  • १६ चेंडू- हार्दिक पांड्या विरुद्ध दक्षिण आफ्रिका (अहमदाबाद, २०२५)
  • १७ चेंडू- अभिषेक शर्मा विरुद्ध इंग्लंड (वानखेडे, २०२५
  • १८ चेंडू - सूर्यकुमार यादव विरुद्ध स्कॉटलँड (दुबई, २०२१)
     

VIDEO : संजूचा पॉवरफुल फटका! चेंडू लागल्यामुळे अंपायरवर इंज्युरी ब्रेक घेण्याची वेळ! नेमकं काय घडलं?


तिलक वर्मासोबत शतकी भागीदारी; हार्दिक पांड्याने २५२ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा

सूर्यकुमार यादवच्या रुपात भारतीय संघाने ११५ धावांवर तिसरी विकेट गमावल्यावर हार्दिक पांड्या फलंदाजीला  आला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या  मालिकेतील दुसरे अर्धशतक झळकावताना त्याने तिलक वर्माच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी ४४ चेंडूत १०५ धावांची भागीदारी रचली.  १६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केल्यावर ही खेळी पुढे नेत त्याने २५ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने २५२ च्या स्ट्राइक रेटनं ६३ धावा कुटल्या.

Web Title : हार्दिक पांड्या का तूफानी अर्धशतक, दक्षिण अफ्रीका के खिलाफ बनाया रिकॉर्ड।

Web Summary : हार्दिक पांड्या ने दक्षिण अफ्रीका के खिलाफ 16 गेंदों में अर्धशतक जड़ा, जो टी20 में भारत के लिए दूसरा सबसे तेज अर्धशतक है। सूर्यकुमार यादव के आउट होने के बाद उन्होंने तिलक वर्मा के साथ साझेदारी करते हुए 25 गेंदों में 63 रन बनाए।

Web Title : Hardik Pandya's blazing fifty sets record against South Africa.

Web Summary : Hardik Pandya smashed a 16-ball fifty against South Africa, the second fastest for India in T20Is. He partnered with Tilak Varma, scoring 63 runs off 25 balls with a strike rate of 252, after Suryakumar Yadav's dismissal.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.