अहमदाबादच्या मैदानातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने आपल्या टी-२० कारकिर्दीतील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. सूर्यकुमार यादव स्वस्तात माघारी फिरल्यावर पांड्या पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. कॉर्बिन बॉशच्या पहिल्याच चेंडूवर त्याने पुढे येऊन फटका खेळला अन् चेंडूला थेट सीमारेषेपलिकडे धाडत आपले इरादे पहिल्या चेंडूवरच स्पष्ट केले. २५ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने त्याने ६३ धावा केल्या. या खेळीबद्दल त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिका विजयानंतर पांड्याने आक्रमक खेळीसंदर्भातील खास गोष्ट शेअर केली. सामनावीर पुरस्कार स्विकारताना तो म्हणाला की, मी कधीच हा पुरस्कार जिंकण्यासाठी खेळत नाही. त्यापेक्षाही माझ्यासाठी संघाचा विजय महत्त्वाचा वाटतो. संघाच्या विजयता योगदान देणं हे समाधानकारक आहे. मी माझ्या संघसहकाऱ्याना आणि पार्टनरला आधीच सांगितलं होतं की, पहिल्याच चेंडूवर पुढे जाऊन षटकार मारणार आहे. आज तोच दिवस होता. मला जी संधी मिळाली त्याचा पूर्ण फायदा घ्यायचा होता. जेव्हा तुम्ही ठरवता त्याप्रमाणेच सगळं घडते त्यावेळी खूप छान वाटते, असे सांगत त्याने आक्रमक खेळी करायच आधीच ठरवलं होते, ही खास गोष्ट शेअर केली आहे.
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअॅक्शन चर्चेत
पांड्यानं जशी मालिकेची सुरुवात केली तसाच शेवटही केला
आशिया कप टी-२० स्पर्धेतील फायनलआधी दुखापतीमुळे हार्दिक पांड्या संघाबाहेर गेला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून त्याने धमाकेदार पुनरागमन केले. पहिल्याच सामन्यात तो फक्त २० धावांवर बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याला बॅटिंग करण्याची वेळच आली नाही. आता पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात त्याच्या बटमधून भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-२० स्पर्धेतील दुसरे सर्वात जलद अर्धशतक आल्याचे पाहायला मिळाले. हार्दिक पांड्याने पुनरागमनाच्या मालिकेत ४ सामन्यातील तीन डावात ७१ च्या सरासरीसह १८६.८४ च्या स्ट्राइक रेटनं १४२ धावा केल्या. याशिवाय गोलंदाजीत त्याने ३ विकेट्सही घेतल्या.