Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : संजूचा पॉवरफुल फटका! चेंडू लागल्यामुळे अंपायरवर इंज्युरी ब्रेक घेण्याची वेळ! नेमकं काय घडलं?

अंपायर पुन्हा आपली भूमिका बजावण्यासाठी सज्ज झाले, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 20:41 IST

Open in App

IND vs SA 5th Sanju Samson's Powerful Shot Injures Umpire Rohan Pandit : भारत–दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा आणि अखेरचा टी-२० सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात शुभमन गिलच्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेल्या संजू सॅमसन याने अभिषेक शर्माच्या साथीनं भारताच्या डावाची सुरुवात केली. त्याने तुफान फटकेबाजीचा नजरणाही पेश केला. सामन्यादरम्यान त्याने ताकदीनं मारलेल्या फटक्यानंतर एक दुर्दैवी घटनाही घडल्याचे पाहायला मिळाले. संजूनं मारलेला जोरदार फटका मैदानातील पंच रोहन पंडित यांच्या गुडघ्यावर लागला. पंचाला झालेल्या दुखापतीमुळे काही वेळ  सामना थांबवावा लागला. यावेळी पंच गुडघा धरून असह्य वेदनेनं व्याकूळ झाल्याचे पाहायला मिळाले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

संजू सॅमसनचा जोरदार फटका, चेंडू अंपारयला लागला अन्...

भारताच्या डावातील ८ व्या षटकात डोनोव्हन फरेरा गोलंदाजीला आला. तिलक वर्मानं या षटकात पहिल्या दोन चेंडूवर दोन चौकार मारल्यावर तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेत स्ट्राइक संजूला दिले. चौत्या चेंडूवर संजूनं ताकदीनं सरळ गोलंदाजाच्या दिशेनं फटका मारला. हा चेंडू आधी गोलंदाजाला लागला अन् मग मैदानातील पंच रोहन पंडित यांच्या गुडघ्यावर जाऊन लागला. पंचांच्या वेदना पाहून दोन्ही संघातील खेळाडूंसह सामना पाहणाऱ्यांमध्ये काही काळासाठी चिंतेच वातावरण निर्माण झाले होते. प्राथमिक उपचारानंतर पंच पुन्हा आपली जबाबदारी स्विकारायला सज्ज झाले.

IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...

अंपायरच्या इंज्युरी ब्रेकनंतर संजूची झंझावाती खेळी थांबली

क्रिकेटच्या मैदानात इंज्युरी ब्रेक हा बऱ्याचदा विकेटची संधी निर्माण करुन जातो. यासामन्यात तसेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. अंपायरच्या इंज्युरी ब्रेकनंतर संजू सॅमसनच्या रुपात टीम इंडियाला दुसरा धक्का बसला. त्याने २२ चेंडूत ३७ धावांची खेळी केली. यात त्याने ४ चौकार आणि २ षटकार मारल्याचे पाहायला मिळाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sanju Samson's powerful shot injures umpire, leading to injury break.

Web Summary : During the India vs South Africa T20 match, Sanju Samson's powerful shot hit umpire Rohan Pandit, forcing an injury break. The umpire was in visible pain, but play resumed after treatment. Samson was out shortly after play resumed.
टॅग्स :दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकासंजू सॅमसन