Join us  

T20 World Cup मध्ये सर्वोत्तम कामगिरी करू! राहुल द्रविडचा विश्वास; म्हणाला, जसप्रीत बुमराहची उणीव जाणवणार

India vs South Afrida 3rd T20I : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२ पूर्वीच्या अखेरच्या सामन्यात भारतीय संघाला घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेकडून हार मानावी लागली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2022 10:21 AM

Open in App

India vs South Afrida 3rd T20I : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२ पूर्वीच्या अखेरच्या सामन्यात भारतीय संघाला घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेकडून हार मानावी लागली. विराट कोहली व लोकेश राहुल यांच्या अनुपस्थितीत भारताची फलंदाजीची फळी कमकुवत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. डेथ ओव्हरमध्ये भारतीय गोलंदाजांनी धावांची भेट देण्याची परंपरा कायम राखल्याने रोहित शर्माच्या चिंतेत भर पडली आहे. दक्षिण आफ्रिकेने ४९ धावांनी हा सामना जिंकला. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी T20 World Cup स्पर्धेत चांगली कामगिरी करून चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवू असा विश्वास व्यक्त केला.  २२८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा ( ०) व श्रेयस अय्यर ( १) हे ४ धावांवर माघारी परतले. रिषभ पंत व दिनेश कार्तिक यांनी भारताला सावरले.रिषभने १४ चेंडूंत २७ धावा केल्या. कार्तिक २१ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ४६ धावा करून माघारी परतला. सूर्यकुमार यादव ( ८), हर्षल पटेल ( १७), अक्षर पटेल (  ९) व आर अश्विन ( २) हेही झटपट माघारी परतले. दीपक चहरने दमदार फटके मारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्याने १७ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३१ धावांची खेळी केली.  उमेश यादवसह त्याने २६ चेंडूंत ४८ धावांची भागीदारी केली. भारताचा डाव १८.३ षटकांत १७८ धावांत गडगडला.

 रोहितने हात जोडले, Deepak Chahar ने अपशब्द वापरले; नेमके Mohammed Sirajने असे काय केले?, Video 

आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉक (६८), रिले रोसोवू ( १००*) आणि डेव्हिड मिलर ( १९*) या डावखुऱ्या फलंदाजांनी धुमाकूळ घातला. क्विंटनला शून्यावर जीवदान देणे खूप महाग पडले. रोसोवूने ट्वेंटी-२०तील पहिले शतक झळकावले. २०व्या षटकात फलंदाजीला आलेल्या मिलरने सलग तीन षटकार खेचून आफ्रिकेला ३ बाद २२७ धावांपर्यंत पोहोचवले.  

राहुल द्रविड काय म्हणाला?दोन्ही मालिकेत चांगला निकाल पाहायला मिळाला. या फॉरमॅटमध्ये तुम्हाला नशिबाचीही साथ लागले आणि विशेषतः जेव्हा सामना अटीतटीचा असतो. आशिया चषक स्पर्धेत तशी साथ मिळाली नाही, परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत नशिबाने साथ दिली. आम्ही प्लेइंग इलेव्हनमध्ये रोटेशन केले आणि हाती आलेल्या निकालाने आनंदी आहे. मागील वर्ल्ड कप स्पर्धेनंतर रोहित शर्मासोबत चर्चा करून याबाबदचा निर्णय घेतला. फलंदाजांची कामगिरी सकारात्मक झाली. डेप्थपर्यंत फलंदाजी करणारा स्ट्रक्चर आम्ही तयार केला आहे. 

जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती हा खूप मोठा धक्का आहे. तो ग्रेट खेळाडू आहे, परंतु खेळात असे होत असते. ही दुसऱ्या कुणासाठी चांगली संधी आहे. आम्ही बुमराहला मिस करतो. आजच्या सामन्यात रिषभ पंत व दिनेश कार्तिक यांना अधिक काळ फलंदाजी करण्याची संधी मिळाली. 

टॅग्स :टी-20 क्रिकेटभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाराहुल द्रविडजसप्रित बुमराह
Open in App