Join us

IND vs SA 3rd T20I Live Updates : पहिल्याच चेंडूवर श्रेयस अय्यर चुकला अन् क्विंटन डी कॉकने आनंद लुटला; रोहित नाराज दिसला

India vs South Afrida 3rd T20I Live Updates : मागील सामन्यात फॉर्मात आलेल्या क्विंटन डी कॉकला पहिल्याच चेंडूवर बाद करण्याची सोपी संधी चालून आली होती. पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 19:28 IST

Open in App

India vs South Afrida 3rd T20I Live Updates : मागील सामन्यात फॉर्मात आलेल्या क्विंटन डी कॉकला पहिल्याच चेंडूवर बाद करण्याची सोपी संधी चालून आली होती. पण, आज प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री झालेल्या श्रेयस अय्यरकडून चूक झाली अन् क्विंटनला जीवदान मिळालं. त्यानंतर आफ्रिकेच्या फलंदाजानं भारतीय गोलंदाजांना चोपायला सुरुवात केली. पाचव्या षटकात उमेश यादवला गोलंदाजीला आणले आणि त्याने आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाला बाद केले. बवुमाची ( ३) खराब कामगिरी याही सामन्यात कायम राहिली. रोहितने सुरेख झेल टिपला. 

लोकेश राहुलच्या गैरहजेरीत टीम इंडियाचा उप कर्णधार कोण? BCCI कडून मिळालं गिफ्ट 

भारतीय संघ इंदूर येथे होणाऱ्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदलासह उतरला. गुवाहाटीत विजय मिळवून भारतीय संघाने प्रथमच घरच्या मैदानावर आफ्रिकेविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका जिंकल्याचा पराक्रम केला. रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विराट व लोकेश यांना विश्रांती दिली गेलीय, अर्शदीप सिंग याला आराम दिला गेलाय. त्याच्या पाठीत दुखत असल्याचे रोहितने सांगितले, परंतु काळजीचं कारण नसल्याचेही तो म्हणाला. श्रेयस अय्यर, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज आज खेळणार आहेत. लोकेशच्या अनुपस्थितीत बर्थ डे बॉय रिषभकडे उप कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

दीपक चहरच्या पहिल्याच चेंडूवर क्विंटन डी कॉकला रन आऊट करण्याची सोपी संधी गमावली. क्विंटने मिड ऑफच्या दिशेने चेंडू टोलावला अन् धाव घेण्यासाठी पळाला, परंतु नॉन स्ट्राईकवर असलेल्या टेम्बा बवुमाचे त्याकडे लक्षच नव्हते. त्यामुळे क्विंटनला माघारी जावे लागले, भारतीय श्रेयस अय्यरने डायरेक्ट हिट केला असता तर क्विंटन रन आऊट झाला असता, पण तो वाचला. त्यानंतर पुढील षटकात मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर क्विंटनने खणखणीत दोन षटकार खेचले, त्यानंर दीपक चहरला मारलेला षटकार पाहण्यासारखा होता. रोहित गोलंदाजावर नाराज दिसला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारोहित शर्माक्विन्टन डि कॉकश्रेयस अय्यर
Open in App