IND vs SA 3rd ODI, Virat Kohli Celebration After Took Easy Catch Of Temba Bavuma : विशाखापट्टणमच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतल्यावर अर्शदीप सिंगनं पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर भारतीय संघाला पहिली विकेट मिळवून दिली. पण त्यानंतर क्विंटन डी कॉक आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा जोडी जमली दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. ही जोडी डोकेदुखी ठरत असताना रवींद्र जडेजा टीम इंडियाच्या मदतीला धावला. त्याने टेम्बा बावुमाच्या खेळीला ब्रेक लावत सेट झालेली जोडी फोडली. विराट कोहलीनं टेम्बा बावुमाचा एक सोपा झेल टिपला. त्यानंतर किंग कोहलीचा अंदाज बघण्याजोगा होता.
सोपा झेल टिपल्यावर किंग कोहलीचं खास अंदाजात सेलिब्रेशन
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २१ व्या षटकात धावफलकावर ११४ धावा लावल्या होत्या. या षटकातील अखेरच्या चेंडूवर रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर टेम्बा बावुमा फसला. ४८ धावांवर तो विराट कोहलीच्या हाती सोपा झेल देत बाद झाला. हा झेल टिपल्यावर कोहलीनं लटकत मटकत विकेटच सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. किंग कोहली मैदानात असला की, तो आपल्या खास शैलीनं लक्षवेधून घेताना पाहायला मिळाले. टेम्बा बावुमाच्या विकेटनंतर त्याने ते दाखवूनही दिले. जड्डूनं टीम इंडियाला दुसरे यश मिळवून दिल्यावर कोहलीनं या विकेटच केलेल्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
IND vs SA : दोन वर्षांनी टीम इंडियाच्या बाजूनं लागला नाणेफेकीचा कौल! या खास Trick सह KL राहुल ठरला टॉसचा बॉस!
क्विंटन डी कॉकच्या साथीनं केली तगडी भागीदारी
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या षटकात पहिली विकेट गमावल्यावर क्विंटन डी कॉक आणि टेम्बा बावुमा यांनी सावध पवित्रा घेतला. दोघांनी संयमी खेळी करत मैदानात धग धरला. मग फटकेबाजीचा नजराणा पेश करत दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. दोघांनी १२१ चेंडूत ११३ धावांची भागीदारी रचली.