India vs South Africa, 3rd ODI Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका वन डे मालिकेचा निर्णायक सामना दिल्लीत खेळवला जातोय... पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाने रांची येथे जबरदस्त कमबॅक केले. इशान किशन व श्रेयस अय्यर यांनी दमदार फलंदाजी करताना भारताला मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. त्यामुळे आजचा सामना हा दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. दिल्लीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांची सरासरी धावसंख्या ही २३० इतकी आहे, दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्धच्या मागील पाच वन डे मालिकांमध्ये चार जिंकलेल्या आहेत. त्यामुळे आजच्या सामन्याची सर्वांनाच उत्सुकता आहे, परंतु सामन्याच्या वेळेतच बदल झालेला पाहायला मिळतोय.
BCCI Elections : तिजोरीच्या चाव्या आशिष शेलार यांच्या हाती; Sourav Ganguly अध्यक्षपदावरून हटणार, Jay Shah सचिवपदी कायम
बीसीसीआयने दिलेल्या अपडेट्सनुसार १ वाजता होणारी नाणेफेक आता १.३० वाजता होणार होती. पण तोही मुहूर्त पुढे ढकलला गेला आहे. दिल्लीत मागील ३-४ दिवस पाऊस पडतोय आणि त्यामुळे खेळपट्टी अजूनही ओली आहे, ती सुकवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. २०१५मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारतात वन डे मालिका जिंकली होती, तर २००५मध्ये चार सामन्यांची मालिका बरोबरीत सोडवली होती. १९९२, १९९६, २००० आणि २०१०मध्ये त्यांना मालिकेत पराभव पत्करावा लागला होती.
रेफरींनी पुन्हा एकदा खेळपट्टीची पाहणी केली आणि हाती आलेल्या माहितीनुसार १.४५ वाजता टॉस होणार असून २.१५ वाजता मॅचला सुरुवात होईल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"