IND vs SA 3rd ODI Live Streaming : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ सामन्यांच्या एकदिवसीय सामन्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी १-१ सामना जिंकला आहे. ६ डिसेंबरला दोन्ही संघातील तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना रंगणार आहे. हा सामना आंध्र क्रिकेट असोसिएशन-विशाखापट्टणम जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (ACA-VDCA) मैदानात खेळण्यात येईल. दोन्ही संघ हा सामना जिंकून मालिका विजयाच्या इराद्याने मैदानात उतरतील. इथं एक नजर टाकुयात हा सामना कधी कुठं अन् कसा पाहता येईल यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नाणेफेकीतील पराभवाची मालिका खंडीत होणार का?
तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात सलग दोन शतके झळकावून मालिकेत जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीसहरोहित शर्माच्या फलंदाजीवर पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतील. याशिवाय कार्यवाहू कर्णधार केएल राहुल अखेरच्या सामन्यात तरी टीम इंडियाच्या नाणेफेकीतील पराभवाची मालिका खंडीत करणार का? तेही पाहण्याजोगे असेल.
विराट कोहलीला तब्बल ७ वर्षानी पुन्हा 'ती' कामगिरी करायची संधी, इतिहासाची पुनरावृत्ती होणार?
कधी अन् कुठं रंगणार सामना?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि अखेरचा ६ डिसेंबरला विशाखापट्टणमच्या ACA-VDCA क्रिकेट स्टेडियम रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी १ वाजता दोन्ही संघातील कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील. त्यानंतर अर्ध्या तासांनी म्हणजे बरोबरी १ वाजून ३० मिनिटांनी सामन्यातील पहिली चेंडू फेकला जाईल.
IND vs SA 3rd ODI Live Streaming संदर्भातील माहिती
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याचे थेट प्रेक्षपण हे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वेगवेगळ्या चॅनेलवरून करण्यात येईल. याशिवाय क्रिकेट चाहते Jiohotstar अॅप आणि वेबसाइटच्या माध्यमातून Live Streaming चा आनंद घेऊ शकतात.
भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, केएल राहुल (कर्णधार, यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह.
दक्षिण आफ्रिका संभाव्य प्लेइंग इलेव्हन :
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एडन मार्करम, टेम्बा बावुमा (कर्णधार), मॅथ्यू ब्रीट्झके,टोनी डी झॉर्झी, डेवाल्ड ब्रेविस, मार्को यान्सेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लुंगी एनिगिडी.