IND vs SA 2nd Test Ravindra Jadeja Breakthrough For India Kyle Verreynne Stumped By Rishabh Pant : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसातील पहिले सत्र दक्षिण आफ्रिकेच्या सेनुरन मुथुसामी आणि काइल व्हेरेइन जोडीनं गाजवलं. दोघांनी सातव्या विकेटसाठी २३६ चेंडूत ८८ धावांची भागीदारी रचली. रवींद्र जडेजाची चतुराई आणि विकेटमागे पंतनं दाखवलेल्या चपळाईच्या जोरावर भारतीय संघाने अखेर दक्षिण आफ्रिकेला सातवा धक्का देण्यात यश मिळवले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जड्डुची चतुराई अन् पंतनं विकेट मागे चपळाई!
दक्षिण आफ्रिकेच्या डावातील १२१ व्या षटकात रवींद्र जडेजा गोलंदाजीला आला. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर काइल व्हेरेइन याने पुढे येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. जड्डूनं आधीच त्याचे इरादे ओळखले आणि चेंडूचा टप्पा बदलून त्याला चकवा दिला. विकेटमागे रिषभ पंतने मग दक्षिण आफ्रिकेच्या सेट झालेल्या बॅटरचा करेक्ट कार्यक्रम केला. त्याने १२२ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ४५ धावा केल्या. चाळीशी पार केल्यावर दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील तो तिसरा फलंदाज ठरला जो अर्धशतकी खेळी करण्यात अपयशी ठरला. याआधी ट्रिस्टन स्टब्स ४९ धावा तर चेम्बा बावुमा याने ४१ धावांवर विकेट गमावली होती.
IND vs SA : कोण आहे Senuran Muthusamy? कसोटी पदार्पणात 'विराट' विकेट; भारताशी खास कनेक्शन अन् बरंच काही
दक्षिण आफ्रिकेच्या संघान उभारली मोठी धावसंख्या
गुवाहाटी कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या दिवसाच्या खेळात प्रत्येक सत्रात किमान एक विकेट घेतली. पण दुसऱ्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाला पहिल्या सत्रात एकही विकेट मिळाली नाही. सातव्या विकेटसाठी टीम इंडियाला दुसऱ्या सत्रापर्यंत प्रतिक्षा करावी लागली. सेनुरन मुथुसामी आणि काइल व्हेरेइन यांच्या दमदार भागीदारीनंतर मुथुस्वामी आणि यान्सेन जोडीनं अर्धशतकी भागीदारी रचत दक्षिण आफ्रिकेनं मोठी धावसंख्या उभारण्याचा डाव साधला आहे. पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा त्यांचा निर्णय सार्थ ठरल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
भारतीय संघासाठी मोठं आव्हान
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या डावात ४०० पारची धावा करत भारतीय संघासाठी हा सामना आणखी आव्हानात्मक केला आहे. कारण दक्षिण आफ्रिकेच्या संघाने हा सामना अनिर्णित राखला तरी ते मालिका जिंकतील. दुसरीकडे भारतीय संघाला मालिका वाचवण्यासाठी हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल.