IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कोलकाता कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा धक्का बसला. या धक्क्यातून सावरत गुवाहटीचं मैदान मारून मालिकेत बरोबरी साधण्याचे मोठे आव्हान टीम इंडियासमोर आहे. गुवाहटी कसोटी सामन्यासाठी शुभमन गिल संघासोबत असेल, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. पण त्याच्या खेळण्यासंदर्भात संभ्रम कायम आहे. दरम्यान भारतीय संघाने पहिल्या कसोटी आधी ज्या खेळाडूला संघाबाहेर काढलं होत त्यालाही गुवाहटी कसोटी आधी पुन्हा बालावलं आहे. इथं जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गुवाहटी कसोटी आधी युवा ऑलराउंडर पुन्हा टीम इंडियाच्या ताफ्यात झाला सामील
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डीचाही समावेश होता. पण कोलकाता कसोटी सामन्याआधी त्याला दक्षिण आफ्रिका 'अ' विरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी रिलीज करण्यात आले होते. पहिल्या अनौपचारिक वनडे सामन्यात भारत 'अ' संघाकडून नितीश कुमार रेड्डीनं ३७ धावांच्या खेळीसह एक विकेट घेतली होती. आता गुवाहटीच्या दुसऱ्या कसोटी आधी तो पुन्हा संघात सामील झाला आहे.
Shubman Gill Medical Update : गिल टीम इंडियासोबत गुवाहटीला जाणार का? BCCI नं माहिती दिली, पण अर्धवट
तो संघात परतला, पण प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा होईल का?
नितीश कुमार रेड्डी हा बॅटिंगसह मध्यम जलगती गोलंदाजीसह उपयुक्त ठरू शकतो. पण गुवाहटीची खेळपट्टीही फिरकीसाठी अनुकूल असण्याची शक्यता आहे. शुभमन गिल दुसऱ्या सामन्याला मुकला तर त्याच्या जागी साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल हे दोन पर्याय आधीच टीम इंडियाकडे उपलब्ध आहेत. गिल संघात असला तरी स्पेशल बॅटरच्या रुपात साई सुदर्शनला दुसऱ्या सामन्यात संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे. मग नितीश रेड्डीचं काम काय? असा प्रश्न निर्माण होतो. कदाचित गिलच्या अनुपस्थितीत उजव्या हाताच्या फंलंदाजाला खेळवण्याचा प्लॅन शिजला तर या परिस्थितीत त्याच्यावर भरवसा दाखला जाऊ शकतो. नितीश कुमार रेड्डीनं आतापर्यंत ९ कसोटी सामने खेळले असून त्याच्या खात्यात ३८६ धावा जमा आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच्या नावे एका शतकाची नोंद आहे. त्याने आतापर्यंत ८ विकेट्ही घेतल्या आहेत.