Yashasvi Jaiswal : खेळ मांडला! यशस्वीला गोलंदाजीची हाव; फलंदाजी वेळी मात्र आपली जबाबदारी विसरला!

आधीच ऑलराउंडरचा भरणा त्यात यशस्वीनं आजमावला गोलंदाजीत हात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 16:10 IST2025-11-25T16:03:28+5:302025-11-25T16:10:02+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs SA 2nd Test Marco Jansen Take Yashasvi Jaiswal Wicket Third Time In Series After Bowling Time | Yashasvi Jaiswal : खेळ मांडला! यशस्वीला गोलंदाजीची हाव; फलंदाजी वेळी मात्र आपली जबाबदारी विसरला!

Yashasvi Jaiswal : खेळ मांडला! यशस्वीला गोलंदाजीची हाव; फलंदाजी वेळी मात्र आपली जबाबदारी विसरला!

IND vs SA Marco Jansen Take Yashasvi Jaiswal Wicket Third Time In Series घरच्या मैदानातील कसोटी सामन्यात भारतीय संघाची अवस्था बिकट झाली आहे. पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाने कोलकाताचं मैदान मारल्यावर गुवाहाटी कसोटीतही टीम इंडियाची बॅटिंग बॉलिंगमधील हवा काढली. भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर संघ निवडीवर आणि संघातील बदलाच्या प्रयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत होत आहे. त्यात खेळाडूंना या पराभवाचं काहीच गांभिर्य नसल्याची गोष्ट चौथ्या दिवसाच्या खेळात पाहायला मिळाली. 

आधीच ऑलराउंडरचा भरणा त्यात यशस्वीनं आजमावला गोलंदाजीत हात 

ऑलराउंडरचा भरणा असलेल्या टीम इंडियाकडून भारताचा युवा बॅटर यशस्वी जैस्वाल यानेही आपल्या अष्टपैलूत्वाची झलक दाखवली. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात तो चक्क गोलंदाजी करताना दिसला. एक षटक टाकताना त्याने ९ धावा खर्च केल्या. भारतीय  संघ सुस्थितीत असताना त्याचा हा तोरा पाहायला मिळाला असता तर ते कौतुकास्पद वाटलं असते. पण संघ आधीच अडचणीत त्यात संघात गोलंदाजीचे अनेक पर्याय असताना पंतनं त्याच्या हाती चेंडू सोपवणं हे म्हणजे खेळ मांडल्यासारखेच होते.

यशस्वीला गोलंदाजीची हाव, फलंदाजी करताना जबाबदारी विसरला!

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने गुवाहाटी कसोटी सामन्यात भारतीय संघासमोर ५४९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या धावांचा पाठलाग करण अशक्य आहे. पण सामना अनिर्णित राखण्यासाठी यशस्वी जैस्वालकडून आश्वासक खेळीची अपेक्षा होती. पण गोलंदाजीत हात आजमावलेला हा गडी फलंदाजीवेळी आपली जबाबदारी विसरला. मार्को यान्सेनच्या गोलंदाजीवर कट शॉट मारण्याच्या नादात त्याने आपली विकेट गमावली. २० चेंडूत १३ धावा करून तो तंबूत परतला. घरच्या मैदानात तिसऱ्यांदा त्याने कट शॉट खेळताना विकेट फेकल्याचे पाहायला मिळाले. एवढेच नाही तिसऱ्यांदा मार्कोनं त्याची शिकार केली. पहिल्या डावात त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धावांचा संघर्ष संपवताना अर्धशतकी खेळी साकारली होती. पण या एकमेव अर्धशतकासह त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका संपुष्टात आली आहे. दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना वाचवण्याचे आव्हान त्याच्या फ्लॉप शोमुळे टीम इंडियाचे टेन्शन वाढले आहे.

Web Title : यशस्वी जायसवाल: गेंदबाजी का शौक, दक्षिण अफ्रीका टेस्ट में बल्लेबाजी विफल!

Web Summary : संघर्षरत भारत के बीच जायसवाल का गेंदबाजी प्रयोग चर्चा का विषय बना। पहली पारी में अर्धशतक के बावजूद, दूसरी पारी में खराब शॉट चयन के कारण सस्ते में आउट, दक्षिण अफ्रीका के खिलाफ भारत की बल्लेबाजी संकट में योगदान।

Web Title : Yashasvi Jaiswal: Bowling ambition, batting failure in South Africa Test!

Web Summary : Jaiswal's bowling experiment amid India's struggles raised eyebrows. Despite a fifty in the first innings, his poor shot selection in the second led to a cheap dismissal, contributing to India's batting woes against South Africa.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.