Join us

IND vs SA, 2nd Test Live Updates : राहुल द्रविड गुरूजींनी शाळा घेतली अन् चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांनी खेळली कारकीर्द वाचवणारी खेळी 

India vs South Africa, 2nd Test Live Updates : कसोटी क्रिकेट कारकीर्द जवळपास संपुष्टात आलीय असे वाटत असताना अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांनी दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात दमदार खेळ केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 16:39 IST

Open in App

India vs South Africa, 2nd Test Live Updates : कसोटी क्रिकेट कारकीर्द जवळपास संपुष्टात आलीय असे वाटत असताना अजिंक्य रहाणेचेतेश्वर पुजारा यांनी दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात दमदार खेळ केला. सातत्यानं अपयशी ठरत असलेल्या पुजारा-रहाणेच्या पाठीशी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड खंबीरपणे उभा राहिला. द्रविडनं या सामन्यापूर्वी पुजारा-रहाणेबाबबत व्यक्त केलेला विश्वास दुसऱ्या डावात सार्थ ठरला. पहिल्या डावात पुजारा ३ आणि रहाणे ० धावांवर माघारी परतल्यानंतर त्यांना कसोटी कारकीर्द वाचवण्यासाठी एकच डाव मिळेल, असे मत महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले होते. पुजारा व रहाणे यांनी आज कारकीर्द वाचवणारी खेळी केली. या दोघांना पहिल्या डावात आलेल्या अपयशानंतर 'Purane' हे ट्रेंड झाले होते. पण, आजच्या खेळीनं त्यांनी नेटिझन्सना आपण पुराने नाहीत हे दाखवून दिले. 

या कसोटीपूर्वी पुजारा-रहाणे यांनी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याच्याशी चर्चा केली. फलंदाजीत काही सुधारणा करण्याचा सल्ला द्रविडकडून त्यांनी घेतला आणि त्याचा फायदा त्यांना झालेला पाहायला मिळाला. पुजारा व रहाणे यांना अनुक्रमे मागील ८ व १० डावांत अर्धशतक झळकावता आलेले नव्हते. पण, आज पुजारानं ६२ चेंडूंत, तर रहाणेनं ७० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. जेव्हा राहुल द्रविड निवृत्त झाला तेव्हा पुजाराला भारताची नवीन Wall असे म्हटले गेले होते. 

पण, डिसेंबर २०१९ पासून पुजारा व रहाणे यांनी मिळून २५.२३च्या सरासरीनं २२७१ धावा केल्या आहेत आणि १२ वेळी ही दोघं शून्यावर बाद झाली आहेत. २०२१मध्ये रहाणेनं १३ कसोटींत ४७९, तर पुजारानं १४ कसोटींत ७०२ धावा केल्या आहेत.  मागील पाच कसोटींत पुजारानं १, ९१, ४, ६१, २६, २२, ०, ४७, ० व १६ अशी, तर अजिंक्यनं १७, ६९, ७१, ३५, ४, ४० व २० अशी कामगिरी केली होती. पण, आज पुजारानं ८६ चेंडूंत ५३ आणि रहाणेनं ७८ चेंडूंत ५८ धावांची खेळी केली. तिसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत भारतानं ६ बाद १८८ धावा करताना १६१ धावांची आघाडी घेतली आहे.  

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाचेतेश्वर पुजाराअजिंक्य रहाणेराहुल द्रविड
Open in App