Join us

IND vs SA, 2nd Test Live Updates : कोकणचा माणूस करतोय जोहान्सबर्गवर अम्पायरिंग; जाणून घ्या कोण आहेत अल्लाहुद्दील पालेकर

India vs South Africa, 2nd Test Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीत चुरशीची टक्कर पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 20:54 IST

Open in App

India vs South Africa, 2nd Test Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीत चुरशीची टक्कर पाहायला मिळत आहे. पण, या सामन्यात अम्पायरिंग करणाऱ्या अल्लाहुद्दीन पालेकर ( South African umpire Allahudien Paleker) यांच्या पदार्पणाची चर्चा अधिक रंगली आहे. पालेकर हे जोहान्सबर्ग सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहेत. पालेकर यांची नाळ ही कोकणशी जोडली गेल्यानं त्यांच्याबाबत अधिक जाणून घेण्याची उत्सुकताही शिगेला पोहोचणे साहजिकच आहे.  

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिव गावातील पालेकर यांचे मुळ आहे. त्यांचे आजोबा शीव गावचे आणि अनेक वर्षांपूर्वी ते दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले. ४४ वर्षीय पालेकर गेली १५ वर्ष अम्पायरिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. याआधी त्यांनी वन डे आणि ट्वेंटी-२० सामन्यांतही अंपायरिंग केलं आहे. ते प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आहेत. PTI ला शीव गावातील सरपंच दुर्वेश पालेकर यांनी सांगितले की,''मी पण पालेकर आहे आणि अल्लाहुद्दीनचे मुळ शिव गावातील आहे. त्याचे वडील नोकरी निमित्त दक्षिण आफ्रिकेत स्थलांतरीत झाला. अल्लाहुद्दीन याचा जन्म हा आफ्रिकेतलाच, परंतु त्याचे मुळे शिव गावातील आहे. संपूर्ण गावाला त्याचा अभिमान वाटतोय. त्याच्यामुळे आमचं आणि आमच्या गावाचं नाव आंतरराष्ट्रीय स्थरावळ पोहोचले.''

अल्लाहुद्दीन यांचे वडिल जमालोद्दीन हेही दक्षिण आफ्रिकेत अम्पायर म्हणून काम करतात. जमालोद्दीन यांनी ९०च्या दशकात महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये अम्पायरिंग केलं आहे. अल्लाहुद्दीन यांनी रणजी करंडक स्पर्धेतही अम्पायरिंग केले आहे. २०१४-१५मध्ये त्यांनी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश लढतीत अम्पायरिंग केले होते. पालेकर यांनी आतापर्यंत ३ वन डे आणि २९  ट्वेंटी-२०  सामन्यात अम्पायरिंग केलं आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारत्नागिरीखेड
Open in App