IND vs SA 2nd T20I Live Streaming : पाहुण्यांना हलक्यात घेऊन चालणार नाही; कुठं आणि कसा पाहता येईल सामना?

इथं एक नजर टाकुयात दोन्ही संघातील दुसरा टी-२० सामना कधी अन् कुठं रंगणार? हा सामना कसा पाहता येईल, यासंदर्भातील सविस्तर माहिती. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 01:00 IST2025-12-11T00:53:45+5:302025-12-11T01:00:08+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs SA 2nd T20I Live Streaming When and Where to watch India vs South Africa T20 live on TV Online | IND vs SA 2nd T20I Live Streaming : पाहुण्यांना हलक्यात घेऊन चालणार नाही; कुठं आणि कसा पाहता येईल सामना?

IND vs SA 2nd T20I Live Streaming : पाहुण्यांना हलक्यात घेऊन चालणार नाही; कुठं आणि कसा पाहता येईल सामना?

IND vs SA 2nd T20I Live Streaming : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने कटकच्या मैदानात पाहुण्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठा धक्का दिला. भारतीय संघाने दिलेल्या १७६ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या ७४ धावांवर आटोपला. या दिमाखदार विजयासह भारतीय संघाने वर्ल्ड कपची तयारी एकदम जोरदार सुरु असल्याची झलक दाखवली. भारतीय संघ मुल्लानपूर क्रिकेट स्टेडियमवर हाच तोरा कायम राखण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरेल. दुसरीकडे पाहुणा संघा हा सामना जिंकून ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील असेल. इथं एक नजर टाकुयात दोन्ही संघातील दुसरा टी-२० सामना कधी अन् कुठं रंगणार? हा सामना कसा पाहता येईल, यासंदर्भातील सविस्तर माहिती. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

 
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-२० सामना कुठं अन् कधी रंगणार?

पंजाब येथील मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-२० सामना खेळवण्यात येणार आहे. गुरुवारी, ११ डिसेंबर २०२५ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी ७ वाजता सामन्याला सुरुवात होईल. अर्धातास अगोदर सूर्यकुमार यादव आणि एडन मार्कमन नाणेफेकीसाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल. 

IND vs SA T20: संजू सॅमसनला Playing XI मध्ये का घेतलं नाही? माजी क्रिकेटरने सांगितलं 'लॉजिक'

IND vs SA T20I सामना कसा पाहता येईल?

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याच्या प्रसारणाचे हक्क हे स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. टेलिव्हिजनवर स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषेत थेट प्रेक्षपणाचा आनंद क्रिकेट चाहते घेऊ शकता. याशिवाय JioHotstar अ‍ॅप आणि वेबसाइटवर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंगही उपलब्ध असेल.  

दक्षिण आफ्रिकेला हलक्यात घेऊन चालणार नाही, कारण...

या वेळीच्या भारत दौऱ्यावरील  दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पलटवार करून आश्चर्यकारक कामगिरीसह भारतीय संघाला धक्क्यावर धक्का दिल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळेच पाहुण्या संघाला हलक्यात न घेता भारतीय संघ व्हाईट बॉल क्रिकेटमधील आपला दबदबा कायम राखण्यासाठी जोर लावताना दिसेल. आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मालिकेतील दोन्ही संघ गत हंगामात टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल खेळले होते. त्यामुळेच ही मालिका पहिल्या सामन्याप्रमाणे एकतर्फी होईल, असे म्हणता येणार नाही. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मालिकेत कमबॅक करण्यासाठी क्विंटन डी कॉक, एडन मार्करम, डेविड मिलर आणि एनरिक नॉर्टजे या अनुभवी खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.

भारताच्या आघाडीच्या फलंदाजीतील डोकेदुखी

पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाच्या आघाडी फळीतील फलंदाजांनी निराश केले. कर्णधार सूर्यकुमार यादवसह उप कर्णधार शुभमन गिलचा टी-२० मधील फॉर्म हा चिंतेचा विषय ठरत आहे. दोघेही सातत्याने धावांसाठी संघर्ष करताना दिसत आहेत. सलामीला चांगली कामगिरी करणाऱ्या संजू सॅमसनला बाकावर बसवून शुभमन गिलला संधी देण्यात आली आहे. तोच प्रयोग कायम राहणार का?  शुभमन गिलची बॅट आता तरी तळपणार का? तेही पाहण्याजोगे असेल.

Web Title : भारत बनाम दक्षिण अफ्रीका दूसरा टी20: स्ट्रीमिंग विवरण और मैच पूर्वावलोकन।

Web Summary : एक प्रभावशाली जीत के बाद, भारत दूसरे टी20 में दक्षिण अफ्रीका से भिड़ेगा। विश्व कप की तैयारी के लिए दोनों टीमों के लिए मैच महत्वपूर्ण है। स्टार स्पोर्ट्स और जियो हॉटस्टार पर लाइव देखें। सीरीज बराबर करने के लिए दक्षिण अफ्रीका के प्रमुख खिलाड़ियों को प्रदर्शन करना होगा।

Web Title : India vs South Africa 2nd T20I: Streaming details and match preview.

Web Summary : After a dominant win, India faces South Africa in the 2nd T20I. The match is crucial for both teams preparing for the World Cup. Watch live on Star Sports and JioHotstar. Key players need to perform for South Africa to level the series.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.