India vs South Africa 2nd ODI Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या वन डेत दोन्ही संघात बदल पाहायला मिळतोय. आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराज याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघातही दोन बदल पाहायला मिळत आहेत.
डेव्हिड मिलर, हेनरिच क्लासेन आणि क्विंटन डी कॉक यांच्या फटकेबाजीने दक्षिण आफ्रिकेने पहिल्या वन डे सामन्यात भारतावर विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मालिकेतील आव्हान कायम राखण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरणार आहेत. दीपक चहरने पाठीच्या दुखापतीमुळे मालिकेतून माघार घेतल्याने भारताची अडचण वाढली आहे. वॉशिंग्टन सुंदरची संघात निवड झालीय, परंतु त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. पहिल्या वन डेत शार्दूल ठाकूर वगळता आवेश खान, मोहम्मद सिराज यांची कामगिरी निराशाजनक झाली होती. कुलदीप यादव व रवी बिश्नोई यांनी विकेट्स घेतल्या, परंतु त्यांनी धावाही दिल्या होत्या.
संजू सॅमसन आणि श्रेयस अय्यर यांनी पहिल्या वन डेत दमदार फलंदाजी केली. शिखर धवन, शुबम गिल व
ऋतुराज गायकवाड यांच्यावर आज चांगली कामगिरी करण्याचे आव्हान असणार आहे. पर्वात सर्वात मोठी समस्या आहे ती गचाळ क्षेत्ररक्षण... भारतीय खेळाडूंनी पहिल्या सामन्यात झेल सोडले, रन आऊट्सच्या संधी गमावल्या आणि त्याचा खूप मोठा फटका बसला. आवेशच्या एका षटकात सिराज व बिश्नोई यांनी दोन सेट फलंदाजांचे झेल टाकले. अष्टपैलू शाहबाज अहमदने आज पदार्पण केले. त्याने १९ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ११०३ धावा व ६२ विकेट्स, २७ लिस्ट ए क्रिकेटमध्ये ६६२ धावा व २४ विकेट्स आणि ट्वेंटी-२०त ५६ सामन्यांत ५१२ धावा व ३९ विकेट्स घेतल्या आहेत.
![]()
दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार टेम्बा बवुमा आज खेळणार नाही, तर केशव महाराज नाणेफेकीला आला आहे. टेम्बासह तब्रेझ शम्सी आज खेळणार नाही. ऋतुराज व बिश्नोई यांच्या जागी आत वॉशिंग्टन सुंदर व शाहबाज यांना संधी दिली गेली आहे
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"