IND vs SA 2nd Test Timings : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. १४ नोव्हेंबरपासून कोलकाताच्या मैदानात रंगणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याआधी गुवाहाटी येथे होणारा दुसरा कसोटी सामना विशेष चर्चेत आला आहे. कारण या कसोटी सामन्यात वेळेच्या बदलासह एक नवा पॅटर्न पाहायला मिळणार आहे. इथं जाणून घेऊयात दुसऱ्या कसोटी सामन्यातील वेळेत नेमका काय बदल करण्यात आला आहे त्यासंदर्भातील माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सामन्याच्या वेळेसह चहापान आणि उपहाराच्या वेळतही बदल
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी दुसऱ्या कसोटी सामन्यातील वेळ आणि सत्रातील बदलामुळे करण्यात येणाऱ्या मोठ्या बदलासंदर्भात पुष्टी केली आहे. गुवाहाटी हे ईशान्य भारतातील शहर आहे. हिवाळ्याच्या दिवसांत तिथं सूर्य लवकर उगवतो. सूर्यास्ताची वेळही लवकर असते. वातावरणातील या बदलामुळेच कसोटी सामन्यातील वेळेत बदल करण्यात आला आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना नेहमीच्या तुलनेत अर्धा तास आधी सुरु होईल. एवढेच नाही तर उपहाराआधी चहापानाचा ब्रेक घेतला जाईल.
IND vs SA : फक्त १० धावा अन् ३ षटकार! सचिनला मागे टाकत जड्डूला दुहेरी विक्रमासह इतिहास रचण्याची संधी
टी ब्रेकनंतर होणार लंच!
गुवाहटीच्या मैदानात २२ नोव्हेंबरपासून भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. पहिल्यांदा या मैदानात कसोटी खेळवली जाईल. या मैदानातील सामना हा ९ वाजता सुरु होईल. कसोटी सामन्यात उपहारानंतर चहापानाचा ब्रेक घेतला जातो. पण गुवाहटीच्या मैदानात आधी चहापान मग उपहारासाठी ब्रेक घेतला जाईल. आतापर्यंत ही गोष्ट डे नाईट कसोटी सामन्यात पाहायला मिळाली आहे. पहिल्यांदाच दिवसाच्या कसोटी सामन्यात टी ब्रेकनंतर लंच ब्रेक घेतला जाईल.
गुवाहाटी कसोटी सामन्याचे वेळापत्रक (India vs South Africa 2nd Test Time changes)
- टॉस: सकाळी ८:३०
- पहिले सत्र: ९:०० ते ११:००
- टी ब्रेक: ११:०० ते ११:२०
- दुसरे सत्र: ११:२० ते १:२०
- लंच: १:२० ते २:००
- तिसरे सत्र: २:०० ते ४:००