IND vs SA 1st Test Ravindra Jadeja Creates History Breaks Multiple World Records : कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या ऐतिहासिक मैदानात रवींद्र जडेजाने आपल्या फिरकीची कमाल दाखवत एका डावात अनेक विक्रमांना गवसणी घातली. पहिल्या डावात ८ षटके टाकून विकेटची पाटी कोरी राहिलेल्या जड्डूनं दुसऱ्या दिवसाच्या खेळातील दुसऱ्या डावात ४ विकेट्स घेतल्या. दुक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात कुलदीप यादवनं सलामीची जोडी फोडल्यावर रवींद्र जडेजा पिक्चरमध्ये आला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'
रवींद्र जडेजान एकापाठोपाठ एक अशा चार विकेट्स घेत पाहुण्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन संघातील फलंदाजांची फिरकी घेतली. त्याने एडन मार्करम, वियान मुल्डर, टेम्बा टोनी डी झॉर्जी आणि ट्रिस्टन स्टब्स यांना तंबूचा रस्ता दाखवत टीम इंडियाला सामन्यावर मजबूत पकड मिळवून दिली. एवढेच नाही तर या कामगिरीसह जड्डून एक नव्हे तर अनेक विक्रमांना गवसणी घातली.
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
WTC स्पर्धेत अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू
जडेजाच्या या शानदार स्पेलसह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) स्पर्धेत इतिहास रचला. WTC मध्ये 150 विकेट आणि 2500 धावा करणारा तो क्रिकेट जगातील पहिला खेळाडू ठरला. जडेजानं WTC स्पर्धेतील ४७ सामन्यात आतापर्यंत २५३२ धावा आणि १५० विकेट्स घेतल्या आहेत.
२००० धावा अन् २५० विकेट्सचा खास डावही साधला
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कोलकाता कसोटी सामन्यात जडेजाने भारतीय मैदानात २५० विकेट्सचा पल्लाही गाठला. अशी कामगिरी करणारा तो चौथा गोलंदाज ठरला. इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड याच्यानंतर एका देशात २००० पेक्षा अधिक धावा आणि २५० विकेट्स घेणारा तो दुसरा गोलंदाज आहे.
भारतीय मैदानात २५० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
- आर. अश्विन -३८३ विकेट्स
- अनिल कुंबळे - ३५० विकेट्स
- हरभजन सिंग- २६५ विकेट्स
- रवींद्र जडेजा - २५०
४००० धावा आणि ३०० पेक्षा अधिक विकेट्स खात्यात जमा करणारा चौथा खेळाडू ठरला जड्डू
जडेजा या कसोटी सामन्यात ४००० धावा आणि ३०० पेक्षा अधिक विकेटचा खास विक्रमही आपल्या नावे केला. अशी कामगिरी करणारा तो चौथा अष्टपैलू खेळाडू आहे. फक्त ८८ सामन्यात ही कामगिरी नोंदवत तो जलगदतीने हा पल्ला गाठणारा दुसरा खेळाडू आहे.
कसोटीत सर्वात जलदगतीने ४०० धावा आणि ३०० पेक्षा अधिक विकेट्स घेणारे खेळाडू
- इयान बोथम -७२ सामने
- रवींद्र जडेजा- ८८ सामने
- कपिल देव- ९७ सामने
- डॅनियल व्हेटोरी -१०१ सामने