IND vs SA: एक छोटीशी चूक अन् हुकला शुबमन गिलचा मोठ्ठा रेकॉर्ड; अवघ्या २ धावांवर झाला बाद

शुबमन गिल बाहेरच्या चेंडूवर खेळून झाला झेलबाद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 05:03 PM2023-12-26T17:03:49+5:302023-12-26T17:11:53+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA 1st Test Live One small mistake and Shubman Gill missed big record of completing thousand runs | IND vs SA: एक छोटीशी चूक अन् हुकला शुबमन गिलचा मोठ्ठा रेकॉर्ड; अवघ्या २ धावांवर झाला बाद

IND vs SA: एक छोटीशी चूक अन् हुकला शुबमन गिलचा मोठ्ठा रेकॉर्ड; अवघ्या २ धावांवर झाला बाद

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Shubman Gill, IND vs SA 1st Test Live Updates : भारतीय संघाची आजपासून दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान आफ्रिकेने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय सार्थ ठरला. भारताकडून सलामीला आलेला कर्णधार रोहित शर्मा ५ धावांवर माघारी गेला तर यशस्वी जैस्वाल १७ धावा काढून बाद झाला. सलामीवीर बाद झाल्यानंतर, भारताचा नव्या दमाचा फलंदाज शुबमन गिल मैदानात आला. त्याच्याकडून चांगल्या आणि मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण तसे होऊ शकले नाही. एका छोटाशा चुकीमुळे शुबमन गिल बाद झाला आणि त्याचे एक मोठे रेकॉर्ड हुकले.

शुभमन गिलने भारतीय संघाकडून कसोटी पदार्पण केले, तेव्हापासून तो टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डरमधील महत्त्वाचा भाग बनला आहे. पहिली कसोटी सुरू होण्याआधी पर्यंत त्याने भारतीय संघासाठी १८ कसोटी सामन्यांमध्ये ९६६ धावा केल्या. त्यात २ शतके आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्यात ३४ धावा केल्या असत्या तर त्याच्या कसोटी क्रिकेटमध्ये एक हजार धावा पूर्ण झाल्या असत्या. पण बाहेरचा चेंडू खेळण्याची चूक त्याला महागात पडली आणि त्यामुळे अवघ्या दोन धावांवर त्याला माघारी परतावे लागले.

पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

पहिल्या कसोटीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ- टेम्बा बावुमा (कर्णधार), डीन एल्गर, एडन मार्करम, टोनी डी जिओर्गी, कीगन पीटरसन, डेव्हिड बॅडिंगहॅम, काइल वॉरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सिन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर.

Web Title: IND vs SA 1st Test Live One small mistake and Shubman Gill missed big record of completing thousand runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.