IND vs SA : बुमराहच्या स्टंप-माइक कमेंटवर दक्षिण आफ्रिकेनं स्पष्ट केली भूमिका! कोच म्हणाले आम्ही…

मैदानात नेमकं काय घडलं? बुमराह दक्षिण आफ्रिकेच्या संघाला नेमकं काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 10:31 IST2025-11-15T10:20:54+5:302025-11-15T10:31:03+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs SA 1st Test Jasprit Bumrah Bauna Taunt For Temba Bavuma South Africa Batting Coach Ashwell Prince Breaks Silence | IND vs SA : बुमराहच्या स्टंप-माइक कमेंटवर दक्षिण आफ्रिकेनं स्पष्ट केली भूमिका! कोच म्हणाले आम्ही…

IND vs SA : बुमराहच्या स्टंप-माइक कमेंटवर दक्षिण आफ्रिकेनं स्पष्ट केली भूमिका! कोच म्हणाले आम्ही…

South Africa Breaks Silence On 'Bauna' Remark At Temba Bavuma By Indian Stars Jasprit Bumrah : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील पहिला दिवस जसप्रीत बुमराहनं आपल्या भेदक माऱ्यानं गाजवला. याशिवाय बुमराहनं WTC चॅम्पियन संघाचा कर्णधार टेम्बा बावुमासमोर केलेला शाब्दिक मारा चर्चेचा विषय ठरत आहे. जसप्रीत बुमराहची  तोंडून न कळतपणे निघालेल्या शब्दांमुळे टीम इंडियासह जसप्रीत बुमराह अडचणीत येणार का? मर्यादा ओलांडल्यामुळे त्याच्यावर ICC कारवाई करणार का? असा प्रश्न चर्चेत असताना आता दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातून या प्रकरणावर प्रतिक्रिया समोर आली आहे. इथं जाणून घेऊयात टेम्बा बावुमाला भारतीय जलदगती गोलंदाज नेमकं काय म्हणाला? दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातून यावर काय प्रतिक्रिया आली? यासंदर्भातील सविस्तर माहिती

मैदानात नेमकं काय घडलं? बुमराह दक्षिण आफ्रिकेच्या संघाला नेमकं काय म्हणाला?

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाच्या खेळातील दक्षिण आफ्रिकेच्या डावातील १३ व्या षटकात जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत होता. या षटकात बुमराहनं दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराच्या विरोधात पायचितची अपील केली. मैदानातील पंचांनी अपील फेटाळल्यावर रिव्ह्यू घेण्यासाठी विकेट किपर आणि उप कर्णधार रिषभ पंत यांच्यातील चर्चेत स्टंप माइकवर ऐकू आलेल्या शब्दांनुसार, 'बौना भी है...' असा उल्लेख झाल्याचे दिसून आले. चेंडूच्या उंचीचा अंदाज लावताना बुमराहने दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा कर्णधार बुटका असल्याचा उल्लेख केला. एवढेच नाही तर व्हायरल व्हिडिओमध्ये बुमराहच्या तोंडून अपशब्द उच्चारल्याचेही ऐकू येते. बुमराह आणि पंत यांच्यातील हा संवाद स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून शांत स्वभावामुळे ओळखला जाणारा बुमराह वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चर्चा रंगू लागली. 
  
दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातून काय आली प्रतिक्रिया?

दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारासमोर जसप्रीत बुमराहनं केलेल्या 'बोलंदाजी'वर  सोशल मीडियावर तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत. जगात भारी असलेल्या गोलंदाजाला असं कृत्य शोभत नाही, अशा आशयाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. पण दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मात्र ही गोष्ट मनावर घेतलेली नाही. पाहुण्या संघाचे फलंदाजी प्रशिक्षक एशवेल प्रिन्स यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, मैदानात जो प्रकार घडला त्यावर विषय मोठी समस्या निर्माण करणारा आहे, असे वाटत नाही.  आम्ही त्या मुद्यावर कोणतीही चर्चा करत नसून तक्रार करण्याचा कोणताही विचार केलेला नाही, असे म्हणत बुमराहचं ते बोलणं मनावर घेतलेले नाही, अशी भूमिका मांडली. दक्षिण आफ्रिकेच्या या भूमिकेमुळे ICC देखील बुमराहची चूक अगदी सहज पोटात घालणार का? ते पाहण्याजोगे असेल.
 

Web Title : IND vs SA: बुमराह की स्टंप-माइक टिप्पणी पर दक्षिण अफ्रीका का स्पष्टीकरण।

Web Summary : दक्षिण अफ्रीका ने टेस्ट मैच के दौरान बुमराह की कथित टिप्पणी को तूल नहीं दिया। कोच इसे कोई बड़ी समस्या या शिकायत नहीं मान रहे। दक्षिण अफ्रीका आगे बढ़ रहा है।

Web Title : SA clarifies stance on Bumrah's stump-mic comment during India Test.

Web Summary : South Africa downplays Bumrah's alleged on-field remarks against their captain during the Test match. Coaches aren't considering it a major issue or complaint. South Africa is moving on.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.