Join us

IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?

...तर ईडन गार्डन्सच्या मैदानात ३९ वर्षांनी जुळून येईल कमालीचा योगोयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 12:59 IST

Open in App

IND vs SA 1st Test Dhruv Jurel Likely To Playing 11 Against South Africa Test : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात १४ नोव्हेंबरपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेआधी भारत 'अ' संघाकडून जुरेल ध्रुव याने दक्षिण आफ्रिका 'अ' विरुद्धच्या दुसऱ्या अनौपचारिक कसोटी सामन्यात दोन्ही डावात शतक झळकावले. त्याच्या शतकी धमाक्यानंतरही भारतीय 'अ' संघाला ४०० पारच्या लढाईत अपयश आले. दक्षिण आफ्रिका 'अ' संघाने ४१७ धावांचा यशस्वी पाठलाग करुन दाखवला. टीम इंडियाच्या पदरी निराशा आली असली तरी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी ध्रुव जुरेल याने प्लेइंग इलेव्हनमधील आपली दावेदारी जवळपास पक्की केली आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

कोलकाताच्या मैदानात रंगणार पहिला कसोटी सामना

कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी त्याला संघात घेण्यासाठी कुणाचा पत्ता कट होणार ते बघण्याजोगे असेल. इथं जाणून घेऊयात 'ध्रुव' तारा चमकल्यामुळे कुणाचा पत्ता कट होणार? यासह त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाल्यावर ३९ वर्षांनी जुळून येणाऱ्या योगोयोगासंर्भातील खास गोष्ट

IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

...तर ईडन गार्डन्सच्या मैदानात ३९ वर्षांनी जुळून येईल कमालीचा योगोयोग

ध्रुव जुरेल याने अखेरच्या ८ प्रथम श्रेणी सामन्यात तीन शतकांसह एक अर्धशतक झळकावले आहे. त्याची ही कामगिरी पाहता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत त्याच्याकडे दुर्लक्षित करणं अशक्य आहे. त्याचा कमालीचा फॉर्म पाहता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तो भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळताना दिसेल हे जवळपास निश्चित आहे. या दौऱ्यात रिषभ पंत विकेट किपरच्या रुपात पहिला पर्याय आहे. तो संघाचा उप कर्णधार असल्यामुळे तो प्लेइंग इलेव्हमध्ये खेळणार हेही निश्चित आहे. त्याच्यासोबत ध्रुव जुरेल याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली तर ३९ वर्षांनी टीम इंडियाचा संघ कसोटीत दोन प्रमुख विकेट किपर बॅटरस मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल. याआधी १९८६ मध्ये किरण मोरे आणि चंद्रकांत पडिंत हे दिग्गज विकेट किपर बॅटर एकाच कसोटीत भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसले होते. 

'ध्रुव' तारा चमकल्यामुळे कुणाचा पत्ता कट होणार?

वेस्ट इंडिज विरुद्धच्या घरच्या मैदानातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ध्रुव जुरेल दोन्ही  सामन्यात खेळला. पण पंत संघात परतल्यामुळे त्याला संघात कायम ठेवण्यासाठी संघ व्यवस्थापनासमोर मोठा तिढा निर्माण झाला आहे. तिसऱ्या क्रमांकावर संघात स्थान देण्यात येणाऱ्या साई सुदर्शन आणि नितीश कुमार रेड्डी या दोघांपैकी एकाच्या जागी तो संघात कायम राहू शकतो. त्यात नितीश कुमार रेड्डीचं स्थान अधिक धोक्यात आहे. सरशेवटी संघ व्यवस्थापन काय डाव खेळणार ते पाहण्याजोगे असेल. अष्टपैलूला पसंती दिली तर साई सुदर्शनचा पत्ताही कट होऊ शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Dhruv Jurel's Rise: Will India Field Two Keepers After 39 Years?

Web Summary : Dhruv Jurel's impressive form raises the possibility of him playing alongside Rishabh Pant in the first Test against South Africa. This could lead to India fielding two wicket-keeper batsmen in a Test match after 39 years, a rare occurrence last seen in 1986.
टॅग्स :दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाभारतीय क्रिकेट संघ