India vs South Africa 1st T20I Live : भारत-दक्षिण आफ्रिका पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यांत धावांचा पाऊस पाहायला मिळाला. भारताने उभं केलेलं २१२ धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेनं ७ विकेट्स राखून सहज पार केले आणि पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आफ्रिकेच्या क्षेत्ररक्षकांकडून जशा चूका झाल्या, तशा भारतीयांकडूनही झाल्या. श्रेयस अय्यरने ( Shreyas Iyer) मोक्याच्या क्षणी रॅसी व्हॅन डेर ड्यूसेनला ( Rassie van der Dussen) झेल सोडून जीवदान दिले. त्यात १९व्या षटकात Umpire's call ने भारताच्या पुनरागमनाची दारं बंद केली. हा सामन्याला कलाटणी देणारा क्षण ठरला असता पण...
श्रेयस अय्यरने चुकीचा कॉल दिला, रिषभ पंत अन् कागिसो रबाडा यांच्यात संघर्ष झाला अन्... Video
इशान किशनने ४८ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह ७६ धावा करून भारताचा पाया मजबूत केला. ऋतुराज गायकवाड ( २३), श्रेयस अय्यर ( ३६), रिषभ पंत ( २९) व हार्दिक पांड्या ( ३१*) यांच्या फटकेबाजीने टीम इंडियाने २११ धावांचा डोंगर उभा केला. दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या षटकात कर्णधार टेम्बा बवुमाची ( १०) विकेट जरी गमावली असली तरी त्यांनी ४.४ षटकांत फलकावर अर्धशतक झळकावले. ड्वेन प्रेटोरियसचा ( २९) व क्विंटन डी कॉक ( २२) हे माघारी परतल्यानंतर डेव्हिड मिलर व रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन यांनी दमदार फटकेबाजी केली.