India vs South Africa 1st ODI Live Updates : ट्वेंटी-२० मालिकेनतंर वर्ल्ड कप संघातील सदस्य ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहेत. पण, शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आजपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे सामन्यात मैदानावर उतरणार आहे. लखनौ येथे होणाऱ्या या सामन्यात पावसाने जवळपास तासभर खोडा घातला आहे आणि आता सामन्याबाबतची नवीन वेळ समोर आली आहे.
शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आजपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत मैदानावर उतरणार आहे. लखनौ इथे होणाऱ्या वन डे सामन्यात पावसाने खोडा घातला. त्यामुळे १ वाजता होणारी नाणेफेक अर्धातास उशीराने करावी लागली, परिणामी सामनाही उशीरा सुरू झाला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत ८७ वन डे सामने झाले आणि त्यात आफ्रिकेने ४९-३५ अशी आघाडी घेतली आहे. ३ सामने अनिर्णित राहीले. पण, घरच्या मैदानावर झालेल्या २८ पैकी १५ सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे. शिखर धवनने आफ्रिकेविरुद्ध २१ वन डे सामन्यांत ५०.८९च्या सरासरीने ९६७ धावा केल्या आहेत. त्यात ३ शतकं व ६ अर्धशतकांचा समावेश आहे. आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने भारताविरुद्ध १६ सामन्यांत ६३.३१च्या सरासहीने १०१३ धावा चोपल्या असून त्यात ६ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे.
२.३० वाजता खेळपट्टीची पुन्हा पाहाणी केली जाणार असून मॅचबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या अपडेट्स नुसार २.३० वाजता नाणेफेक होणार असून ३ वाजल्यापासून प्रत्येकी ४५-४५ षटकांची मॅच खेळवली जाणार आहे.
भारताचा संघ - शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर ( उप कर्णधार), ऋतुराज गायकवाड, रजत पाटिदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, शाहबाज अहमद, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज, दीपक चहर.
दक्षिण आफ्रिकेचा संघ - टेम्बा बवुमा ( कर्णधार), क्विंटन डी कॉक, रिझा हेंड्रीक्स, हेनरिच क्लासेन, केशव महाराज, येनमन मलान, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिच नॉर्खिया, वेन पार्नेल, एडिल फेहलुकवायो, ड्वेन प्रेटोरियस, कागिसो रबाडा, तब्रेझ शम्सी.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"