Join us

IND vs SA 1st ODI Live Updates : शार्दूल ठाकूर धावून आला; Kuldeep Yadav ने घेतलेली विकेट पासून बाबर आजम आठवला, Video  

India vs South Africa 1st ODI Live Updates : सावध सुरुवातीनंतर दक्षिण आफ्रिकेने चार विकेट्स गमावल्या. टेम्बा बवुमाचा अपयशाचा पाढा याही सामन्यात कायम राहिला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 17:46 IST

Open in App

India vs South Africa 1st ODI Live Updates : सावध सुरुवातीनंतर दक्षिण आफ्रिकेने चार विकेट्स गमावल्या. टेम्बा बवुमाचा अपयशाचा पाढा याही सामन्यात कायम राहिला. क्विंटन डी कॉक व यानेमन मलान ही ओपनिंग जोडी तोडण्यासाठी कर्णधार शिखर धवनने शार्दूल ठाकूरला गोलंदाजीला आणले आणि त्याने त्याचे काम केले. शार्दूलच्या दोन विकेट्सनंतर कुलदीप यादवने ( Kuldeep Yadav) एडन मार्करामचा त्रिफळा उडवला अन् अनेकांना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम आठवला. त्यानंतर रवी बिश्नोईने सेट फलंदाज क्विंटला माघारी पाठवले.

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आजपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे सामन्यात मैदानावर उतरला. ऋतुराज गायकवाडने आज पदार्पण केले आणि भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्यात पावसाने जवळपास दोन तास खोडा घातला होता आणि त्यामुळे सामन्यातील षटकांची संख्या ४०-४० अशी करण्यात आली. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत ८७ वन डे सामने झाले आणि त्यात आफ्रिकेने ४९-३५ अशी आघाडी घेतली आहे. ३ सामने अनिर्णित राहीले. पण, घरच्या मैदानावर झालेल्या २८ पैकी १५ सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे. 

शिखर धवनने आफ्रिकेविरुद्ध २१ वन डे सामन्यांत ५०.८९च्या सरासरीने ९६७ धावा केल्या आहेत.  त्यात ३ शतकं व ६ अर्धशतकांचा समावेश आहे. आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने भारताविरुद्ध १६ सामन्यांत ६३.३१च्या सरासहीने १०१३ धावा चोपल्या असून त्यात ६ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-२० मालिका गाजवणाऱ्या क्विंटन डी कॉकने पहिल्या वन डेत यानेमन मलानसह आफ्रिकेला सकारात्मक सुरुवात करून दिली. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर क्विंटनसाठी LBW ची जोरदार अपील झाली आणि DRS ही घेतला गेला, परंतु अम्पायर्स कॉल दिल्याने आफ्रिकेचा सलामीवीर नाबाद राहिला. शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीवर शुबमन गिलने स्लिपमध्ये मलानचा सोपा झेल टाकला. आफ्रिकेने पहिल्या १० षटकांत ४१ धावा केल्या होत्या. पण शार्दूलने ही विकेट मिळवलीच. मलानला त्याने २२ धावांवर श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केले. फॉर्माशी झगडणाऱ्या टेम्बा बवुमाची सुरुवात चाचपडत झाली, परंतु त्याने रवी बिश्नोईच्या एका षटकात दोन चौकार खेचून आत्मविश्वास कमावला. पण, शार्दूलने त्याचा त्रिफळा उडवला. बवुमा ८ धावांवर माघारी परतला. कुदीपने गुगली टाकून मार्करामचा त्रिफळा उडवला. अशाच प्रकारने २०१९च्या वर्ल्ड कप मध्ये बाबरचा त्रिफळा उडवला होता. 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाकुलदीप यादवशार्दुल ठाकूरबाबर आजम
Open in App