India vs South Africa 1st ODI Live Updates : ट्वेंटी-२० मालिकेतील शतकवीर डेव्हिड मिलरने भारताविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यातही अर्धशतक झळकावले. त्याने हेनरिच क्लासेनसह पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना दक्षिण आफ्रिकेला सन्मानजनक धावा उभ्या करून दिल्या. सलामीवीर क्विंटन डी कॉकनेही चांगली सुरुवात करून दिली. शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव व रवी बिश्नोई यांना विकेट घेण्यात यश मिळाले. क्लासेननेही अर्धशतक झळकावले. या दोघांनी नंतर वादळी खेळी करून भारतासमोर तगडे लक्ष्य उभे केले.
शार्दूल ठाकूर धावून आला; Kuldeep Yadav ने घेतलेली विकेट पासून बाबर आजम आठवला, Video
शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आजपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे सामन्यात मैदानावर उतरला. ऋतुराज गायकवाडने आज पदार्पण केले आणि भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्यात पावसाने जवळपास दोन तास खोडा घातला होता आणि त्यामुळे सामन्यातील षटकांची संख्या ४०-४० अशी करण्यात आली. ट्वेंटी-२० मालिका गाजवणाऱ्या क्विंटन डी कॉकने पहिल्या वन डेत यानेमन मलानसह आफ्रिकेला सकारात्मक सुरुवात करून दिली. शार्दूल ठाकूरने ही जोडी तोडली आणि मलानला २२ धावांवर श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केले.
क्विंटन व मलान यांनी ४९ धावांची भागीदारी केली. फॉर्माशी झगडणाऱ्या टेम्बा बवुमाची सुरुवात चाचपडत झाली, परंतु त्याने रवी बिश्नोईच्या एका षटकात दोन चौकार खेचून आत्मविश्वास कमावला. पण, शार्दूलने त्याचा त्रिफळा उडवला. बवुमा ८ धावांवर माघारी परतला. कुदीपने गुगली टाकून मार्करामचा त्रिफळा उडवला. अशाच प्रकारने २०१९च्या वर्ल्ड कप मध्ये बाबरचा त्रिफळा उडवला होता.
बिश्नोई महागडा गोलंदाज ठरला, त्याने ८ षटकांत ६९ धावा देत १ विकेट घेतली. क्लासेनने ६५ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ७४ धावा केल्या, तर मिलर ६३ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ७५ धावांवर नाबाद राहिला. आफ्रिकेने ४ बाद २४९ धावा केल्या. या दोघांनी १०६ चेंडूंत १३९ धावांची भागीदारी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"