Cricket Fan Breached The Field To Touch Virat Kohli’s Feet : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना रांचीच्या मैदानात रंगल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात हिटमॅन रोहित शर्माच्या अर्धशतकी खेळीनतंर किंग कोहलीच्या भात्यातून विक्रमी सेंच्युरी आली. कोहलीनं शतक झळकावल्यावर उडी मारून आपल्या स्टाईलमध्ये शतकी आनंद व्यक्त केला. या दरम्यान एक चाहता सुरक्षाकडे भेदून थेट किंग कोहलीपर्यंत पोहचल्याचे पाहायला मिळाले.
सामन्यादरम्यान कधी अन् नेमकं काय घडलं?
भारताच्या डावातील ३८ व्या षटकात मार्को यान्सेन गोलंदाजीला आला. या षटकात चौथा चेंडू निर्धाव खेळल्यावर पाचव्या चेंडूवर खणखणीत चौकार मारत विराट कोहलीनं वनडेतील ५२ व्या शतकाला गवसणी घातली. तो शतकाचं सेलिब्रेशन करत असताना एक चाहता मैदानात घुसला. एवढेच नाही तर तो कोहलीपर्यंत पोहचला. कुणाला कळायच्या आत सुसाट वेगाने मैदानात येऊन तो थेट कोहलीच्या पायात पडला. हे सगळं अचानक घडल्यामुळे कोहलीही क्षणभर आवाक् झाला. त्यानंतर संबंधित व्यक्तीला सुरक्षा रक्षकांनी मैदानाबाहेर नेल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहलीसोबत याआधीही असं घडले आहे. त्यात आता रांची मैदानावर त्याची क्रेझ पाहायला मिळाली.
'रनमशिन' कोहलीचा मोठा पराक्रम! क्रिकेटच्या देवालाच मागे टाकत बनला वनडेतील शतकांचा 'बादशहा'
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात नव्वदीच्या घरात पोहचल्यावर शतकापर्यंत कोहलीची धावगती मंदावली होती. पण शतक पूर्ण करताच त्याने गियर बदलला. या सान्यात कोहलीनं १२० चेंडूत ११ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने १३५ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीसह कोहलीसाठी कायपण... असं म्हणत थेट मैदानात घुसलेला चाहता चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.
Web Summary : During the India-South Africa match, a fan ran onto the field after Virat Kohli's century and touched his feet. The incident occurred after Kohli celebrated his century. Security escorted the fan off the field.
Web Summary : भारत-दक्षिण अफ्रीका मैच के दौरान, विराट कोहली के शतक के बाद एक प्रशंसक मैदान में घुस गया और उनके पैर छुए। कोहली के शतक का जश्न मनाने के बाद यह घटना हुई। सुरक्षाकर्मियों ने प्रशंसक को मैदान से बाहर निकाला।