IND vs PAK U19 Asia Cup Final : दुबईच्या मैदानात पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यात आशिया कप फायनलचा थरार रंगणार आहे. वरिष्ठ संघानंतर आता अंडर-१९ एकदिवसीय आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. इथं एक नजर टाकुयात कधी आणि कुठं रंगणार भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना? क्रिकेट चाहत्यांना हा सामना कसा पाहता येईल? त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
IND vs PAK U19 Asia Cup Final सामना कधी अन् कुठं रंगणार?
अंडर १९ आशिया कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना रविवारी, २१ डिसेंबर २०२५ रोजी रंगणार आहे. दुबईतील आयसीसी अकादमीच्या मैदानात हा सामना खेळवण्यात येईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी हा सामना सुरु होईल.
Flashback 2025 : T20 मध्ये अभिषेक शर्माचा मोठा धमाका; पण 'विराट' विक्रमापर्यंत नाही पोहचला!
भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना TV Channels आणि Live Streaming वर कसा पाहता येईल?
भारतातील चाहते सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील टेन १, टेन २, टेन ३, टेन ४ - एचडी आणि एसडी दोन्ही चॅनेलवर अंडर १९ आशिया कप २०२५ स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील लढत पाहता येईल. सोनी टेन ३ (एसडी आणि एचडी) चॅनेलवर हिंदी आणि सोनी टेन ४ च्या माध्यमातून तमिळ आणि तेलुगू भाषेतील समालोचनासह या सामन्याचा आनंद क्रिकेट चाहत्यांना घेई शकतात. याशिवाय Sony LIV वर या सामन्याचे लाइव्ह स्ट्रेमिंग उपलब्ध असेल.
U19 आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाचा दबदबा; कसा आहे पाकिस्तानचा रेकॉर्ड
अंडर १९ आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. १९८९ पासून ते २०२४ च्या १४ व्या हंगामापर्यंत भारतीय संघाने ९ वेळा फायनल गाठली असून (१९८९, २००३, २०१२, २०१३–१४, २०१६, २०१८, २०१९, २०२१) विक्रमी सर्वाधिक ८ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. पाकिस्तानच्या संघाने ३ वेळा फायनल खेळताना फक्त एकदा भारतीय संघासोबत संयुक्तरित्या जेतेपद पटकावले आहे. २०१२ च्या हंगामात भारत-पाकिस्तान यांच्याती सामना बरोबरीत सुटल्यावर दोन्ही संघांना संयुक्तरित्या विजेता घोषित करण्यात आले होते.
वैभव सूर्यंवशीसह या युवा खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा
पाकिस्तान विरुद्धच्या साखळी फेरीतील लढतीत वैभव सूर्यवंशीला मोठी खेळी करता आली नव्हती. फायनलमध्ये त्याच्याकडून धमाकेदार कामगिरीची अपेक्षा असेल. यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या फलंदाजांच्या यादीत वैभव सूर्यवंशी चौथ्या स्थानावर आहे. ४ डावात १ शतक आणि १अर्धशतकासह त्याने २३५ धावा केल्या आहेत. १७१ ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. त्याच्याशिवाय भारताकडून अभिज्ञान कुंडू २६३ धावांसह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. नाबाद २०९ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. पाकिस्तानचा समीर मिन्हास १ शतक आणि १ अर्धशतकासह २९९ धावांसह स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.