IND vs PAK U19 Asia Cup Final : अंडर १९ आशिया कप स्पर्धेच्या १२ व्या हंगामातील अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या संघाने अपराजित राहिलेल्या युवा टीम इंडियाला पराभवाचा धक्का दिला. भारताचा दबदबा असणाऱ्या आशिया कप स्पर्धेत फायनल बाजी मारत पाकिस्तानच्या संघाने २०१२ नंतर दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. याआधी २०१२ मध्ये पाकिस्तानच्या संघाने भारतासोबत संयुक्तरित्या जेतेपद मिळवले होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघाने उभारला धावांचा डोंगर, अन्...
नाणेफेक जिंकल्यावर भारतीय संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे याने गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना समीर मिन्हासची विक्रमी शतकी खेळी १७२ (११३) आणि अहमद हुसेनच्या अर्धशतकाच्या जोरावर ५६ (७२) धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर पाकिस्तानच्या संघाने निर्धारित ५० षटकात ८ बाद ३४७ धावा करत भारतीय संघासमोर ३४८धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने धमाकेदार सुरुवात केली. पण मोठी धावसंख्या करण्यात तो अपयशी ठरला. त्याच्याशिवाय अन्य फलंदाजाही सपशेल अवयशी ठरले. परिणामी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघ २६. २ षटकात १५६ धावांवर आटोपला. पाकिस्तानच्या संघाने १९१ धावांनी विजय नोंदवत १३ वर्षांनी आशिया कप ट्रॉफीवर नाव कोरले.
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
Web Summary : Pakistan U19 team defeated undefeated India in Asia Cup final. Pakistan won the trophy after 13 years, dominating the match.
Web Summary : पाकिस्तान U19 टीम ने एशिया कप फाइनल में अपराजेय भारत को हराया। पाकिस्तान ने 13 साल बाद ट्रॉफी जीती, मैच पर दबदबा बनाया।