IND vs PAK Ayush Mhatre And Vaibhav Suryavanshi Heated Exchange With Pakistani Pacer Ali Raza : दुबई येथील ICC अकादमीच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात आला. भारतीय संघाचा दबदबा असलेल्या या स्पर्धेत फायनलची लढाई ३०० पारची करत पाकिस्तानच्या संघाने दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारत-पाक खेळाडूंमध्ये वाद
पाकिस्तानकडून फलंदाजीत समीर मिन्हास याने बिनधास्त फटकेबाजीचा नजराणा पेश केल्यावर गोलंदाजीत अली रझानं भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी यांची विकेट घेत पाकिस्तानच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारतीय संघाच्या सलामीवीरांची विकेट घेतल्यावर अली रझा याने आक्रमक अंदाजात विकेटचा आनंद व्यक्त केला. त्यामुळे मैदानात वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. आयुष म्हात्रेसहवैभव सूर्यवंशीनं त्याला शाब्दिक माऱ्यासह प्रत्युत्तर दिले. मैदानात जे घडलं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
पहिल्या षटकात अली रझाची धुलाई
पाकिस्तान संघाने दिलेल्या ३४८ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून वैभव सूर्यवंशी याने धमाकेदार अंदाजात सुरुवात केली. वैभव सूर्यवंशीनं अली रझाच्या पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार मारत आपले आणि संघाचे खाते उघडले. या षटकात वैभव सूर्यवंशीनं १८ तर आयुष म्हात्रेनं केलेल्या एका धावेशह अतिरिक्त ३ धावांसह भारतीय संघाला २१ धावा मिळाल्या. दुसऱ्या षटकात मोहम्मद सय्यमच्या गोलंदाजीत ११ धावा कुटत भारतीय सलामीवीरांनी दुसऱ्या षटकानंतर भारताच्या धावफलकावर ३२ धावा लावल्या होत्या.
आधी आयुष म्हात्रे पाकिस्तानी गोलंदाजावर संतापला, मग वैभव सूर्यवंशीनंही काढला राग
अली रझानं पहिल्या षटकात धुलाई झाल्यावर दमदार कमबॅक करताना आयुष म्हात्रेच्या रुपात भारतीय संघाला पहिला धक्का दिला. ही विकेट मिळाल्यावर त्याने आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन करताना आयुष म्हात्रेला उद्देशून काही तर म्हटले. ते ऐकून तंबूच्या दिशेनं जाणारा आयुष म्हात्रे पुन्हा गोलंदाजाच्या दिशेनं येताना दिसला. त्यानेही त्याच्यावर शाब्दिक पलटवार केला. अली रझानं वैभव सूर्यवंशीची विकेट घेतल्यावर पुन्हा तेच केले. मग १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनंही त्याला त्याची जागा दाखवली. तुम्ही बोलला तर आम्ही गप्प नाही बसणार; असा काहीसा पवित्रा भारतीय बॅटर्संनी पाक बॉलच्या विरोधात घेतल्याचे पाहायला मिळाले. ही गोष्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
Web Summary : During the U19 Asia Cup final between India and Pakistan, heated exchanges occurred between Indian batsmen Ayush Mhatre, Vaibhav Suryavanshi and Pakistani pacer Ali Raza after aggressive celebrations followed dismissals. The incident sparked reactions online.
Web Summary : भारत और पाकिस्तान के बीच अंडर-19 एशिया कप के फाइनल के दौरान, भारतीय बल्लेबाज आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी और पाकिस्तानी तेज गेंदबाज अली रजा के बीच तीखी बहस हुई। विकेट मिलने पर जश्न मनाने के बाद यह घटना हुई, जिसने ऑनलाइन प्रतिक्रियाओं को जन्म दिया।