Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs PAK: "पुढच्या वेळी टीम इंडियाविरूद्ध खेळू तेव्हा..."; पाकिस्तानच्या उस्मान तारिकचा इशारा

IND vs PAK T20 World Cup 2026: भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 14:13 IST

Open in App

IND vs PAK T20 World Cup 2026: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी२० वर्ल्डकप २०२६च्या सामन्यात टीम इंडियाने सहज विजय मिळवला. इशान किशनच्या ७७ धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी धुव्वा उडवला. पाकिस्तानच्या संघाकडून फारशी झुंज पाहायला मिळाली नाही. टीम इंडियाने एकतर्फी सामना जिंकल्याने पाकिस्तानी चाहते भलतेच नाराज झाले. या पराभवानंतर पाकिस्तानचा बहुचर्चित गोलंदाज उस्मान तारिक याने प्रतिक्रिया दिली.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

"जेव्हा तुम्ही तुमच्या आधीच्या सामन्यातील चुकांमधून शिकत नाही, तोपर्यंत तुम्हाला एक संघ म्हणून चांगली कामगिरी करता येत नाही. आम्ही आमच्या चुकांवर काम करत आहोत आणि सुधारणा करायचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे आम्ही नक्कीच चांगली कामगिरी करू शकतो यात वाद नाही. पुढील सामन्यांमध्ये त्याच चुका पुन्हा करायच्या नाहीत हे आम्हाला पाहावे लागेल. 

भारताचा विजय अतिशय सहज झाला. आमच्याकडून अपेक्षित झुंज दिसली नाही. त्यामुळे चाहत्यांचाही भ्रमनिरास झाला. कारण हा सामना आमचा पूर्ण देश पाहत होता. त्यांची निराशा झाली हे फार वाईट झाले. पण आता आम्हाला आशा आहे की, पुढल्या वेळी जेव्हा आम्ही टीम इंडियाशी खेळू, तेव्हा आम्ही नक्कीच चांगली कामगिरी करू.

बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी या दोघांनीही पाकिस्तानसाठी अनेक सामने जिंकून दिले आहेत. जर ते एखाद्या सामन्यात अपयशी ठरले तर त्यांच्यावर टीका करणे किंवा त्यांना कमी लेखणे चुकीचे आहे. आमच्या संघात विश्वासाची कमी नाही. आम्ही ज्या संघाविरूद्ध मैदानात उतरू, त्यांच्याविरोधात विजय मिळवण्यासाठीच खेळू. फायनलचा सामना खेळणे आणि विजेतेपद मिळवून ट्रॉफी जिंकणे हे आमचे लक्ष्य आहे," असेही उस्मान तारीक म्हणाला.

English
हिंदी सारांश
Web Title : IND vs PAK: Usman Tariq warns India for next encounter.

Web Summary : After Pakistan's loss to India, Usman Tariq emphasized learning from mistakes. He expressed disappointment but assured fans of improved performance in future encounters. He defended Babar Azam and Shaheen Afridi, reinforcing the team's goal to win the World Cup.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारत विरुद्ध पाकिस्तानपाकिस्तानभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ