IND vs PAK : पाकचा धुव्वा उडवल्यावर हस्तांदोलनाच्या वेळी सूर्याला आला राग! नेमकं काय घडलं? (VIDEO)

इथं जाणून घेऊयात IND vs PAK यांच्यातील सामन्यानंतर मैदानात नेमकं काय घडलं? सूर्या कुणावर चिडला? यासंदर्भातील सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 02:10 IST2026-02-16T02:07:11+5:302026-02-16T02:10:06+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs PAK Suryakumar Yadav Fumes At Kuldeep Yadav After He Dropped Catch At Boundary Line Hardik Was Also Seen In Anger Watch Video | IND vs PAK : पाकचा धुव्वा उडवल्यावर हस्तांदोलनाच्या वेळी सूर्याला आला राग! नेमकं काय घडलं? (VIDEO)

IND vs PAK : पाकचा धुव्वा उडवल्यावर हस्तांदोलनाच्या वेळी सूर्याला आला राग! नेमकं काय घडलं? (VIDEO)

IND vs  PAK Suryakumar Yadav Fumes At Kuldeep Yadav : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील बहुचर्चित सामन्यात अपेक्षेप्रमाणे भारतीय संघाने दिमाखदार कामगिरी करून दाखवत पाकिस्तान विरुद्धचा आपला दबदबा कायम राखला. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज लढतीत भारतीय संघाने ६१ धावांनी मोठ्या विजयासह अगदी दाबात सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यातही भारतीय संघाने आशिया कप स्पर्धेतील पाकिस्तानी खेळाडूंसोबत 'नो हँडशेक' भूमिका कायम ठेवली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

...अन् भारत-पाक सामना संपल्यावर हस्तांदोलनाच्या वेळी सूर्याचा पारा चढला!

भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना संपल्यावर विजयाचा आनंद साजरा करत असताना हस्तांदोलनाच्या वेळी सूर्यकुमार यादव चांगलाच संतापल्याचे पाहायला मिळाले.  हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. इथं जाणून घेऊयात IND vs PAK यांच्यातील सामन्यानंतर मैदानात नेमकं काय घडलं? सूर्या कुणावर चिडला? यासंदर्भातील सविस्तर

IND vs PAK : ईशान किशनसह ५ धुरंधरांचा जलवा; पाकिस्तानवर पुन्हा एकदा आली तोंडावर पडण्याची वेळ!

नो हँडशेक भूमिका कायम, मग सूर्या कुणावर वैतागला!

आशिया कप स्पर्धेप्रमाणेच IND vs PAK यांच्यातील टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यातील नाणेफेकीच्या वेळी दोन्ही संघातील कर्णधारांनी हस्तांदोलन करणं टाळलं. सामन्यानंतरही तेच चित्र पाहायला मिळाले. दोन्ही संघातील खेळाडूंनी एकमेकांसोबत हस्तांदोलन केले नाही. पण भारतीय संघातील खेळाडूंनी विजयानंतर आनंद व्यक्त करताना हस्तोंलन करत विजय साजरा केला. यादरम्यान सूर्यकुमार यादव कुलदीपवर चांगलाच संतापला. 

आपल्याच सहकाऱ्यावर का चिडला सूर्या दादा?

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजय नोंदवला. महत्त्वाच्या सामन्यात संधी दिल्यावर कुलदीप यादवनंही चांगली गोलंदाजी केली. पण पाकिस्तानच्या डावातील १८ व्या षटकात त्याने सीमारेषेवर एक सोपा झेल सोडला. याच षटकात पाकिस्तानचा संघ ऑलआउट झाला अन् मग सूर्यकुमार यादवनं कॅच सोडल्याच्या कारणावरून कुलदीपवर राग व्यक्त केला. दोघांच्यातील हस्तांदोलनाच्या दरम्यान जे चित्र पाहायला मिळाले त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सूर्यानं राग काढण्याआधी गोलंदाजी करताना पांड्यानेही झेल सुटल्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले होते. 

गोलंदाजीत कमाल

कुलदीप यादवकडून झेल भलेही सुटला. पण गोलंदाजीत भारतीय फिरकीपटूनं कमाल केली. ३ षटकांत १४ धावा खर्च करताना त्याने एक महत्त्वपूर्ण विकेट घेत आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला.  या सामन्यात भारताच्या चार गोलंदाजांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तिलक वर्मालाही एक बळी मिळाला, मात्र फिल्डिंगदरम्यान त्याच्याकडूनही एक झेल सुटला.

 

Web Title : IND vs PAK: कैच छूटने पर सूर्यकुमार यादव को कुलदीप पर गुस्सा!

Web Summary : टी20 वर्ल्ड कप में भारत ने पाकिस्तान को हराया। सूर्यकुमार यादव कैच छूटने पर कुलदीप यादव पर गुस्सा हुए। इसके बावजूद कुलदीप ने अच्छी गेंदबाजी की और एक महत्वपूर्ण विकेट लिया। भारत ने पाकिस्तान के साथ 'नो हैंडशेक' नीति बरकरार रखी।

Web Title : IND vs PAK: Suryakumar Yadav's anger at Kuldeep after dropped catch.

Web Summary : India defeated Pakistan in a thrilling T20 World Cup match. Suryakumar Yadav was visibly angry with Kuldeep Yadav for dropping a catch. Despite this, Kuldeep bowled well, taking a crucial wicket. India maintained its 'no handshake' policy with Pakistan.