IND vs PAK : "एक मॅच जिंकवू शकत नाही, अन् म्हणे सुपरस्टार!" अख्तरची बाबरवर टीका; नक्वींवरही निशाणा

PCB अध्यक्षांसह अख्तरने वरिष्ठ खेळाडूंवरही साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 14:03 IST2026-02-16T13:50:07+5:302026-02-16T14:03:37+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs PAK Shoaib Akhtar Blasts PCB Chief Mohsin Naqvi Babar Azam After India Defeat Pakistan In ICC T20 World Cup 2026 | IND vs PAK : "एक मॅच जिंकवू शकत नाही, अन् म्हणे सुपरस्टार!" अख्तरची बाबरवर टीका; नक्वींवरही निशाणा

IND vs PAK : "एक मॅच जिंकवू शकत नाही, अन् म्हणे सुपरस्टार!" अख्तरची बाबरवर टीका; नक्वींवरही निशाणा

IND vs PAK Shoaib Akhtar Blasts PCB Chief Mohsin Naqvi Babar Azam  : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानसमोर आपले नाणे खणखणीत असल्याचे दाखवून दिले. कोलंबोच्या आर. प्रेमदासाच्या मैदानात रंगलेल्या हाय-व्होल्टेज लढतीत ईशान किशनच्या ४० चेंडूतील ७७ धावांच्या शानदार खेळीनंतर हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनी गोलंदाजीत धमक दाखवली. भारतीय संघाने दिलेल्या १७६ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ११४ धावांवर आटोपला.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

PCB अध्यक्षांसह अख्तरने वरिष्ठ खेळाडूंवरही साधला निशाणा

भारतीय संघाविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 'रावळपिंडी एक्स्प्रेस' नावाने ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरनं याने एका वृत्त वाहिनीवरील मुलाखतीमध्ये नाव न घेता पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि पाकिस्तानी सरकारमधील मंत्री मोहसीन नक्वी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. एवढेच नव्हे तर त्याने अनुभवी आणि स्टार खेळाडूंनाही आरसा दाखवला आहे.

IND vs PAK: पराभव दिसताच पीसीबी अध्यक्ष मोहसीन नकवींचे पलायन; शेवटचा चेंडू पहायला देखील थांबले नाहीत

पाकिस्तानच्या पराभवावर काय म्हणाला अख्तर?

अख्तर म्हणाला की, "ज्यांना क्रिकेटचं ज्ञान नाही, ते पीसीबीचे चेअरमन झाले आहेत. अशा लोकांकडे जबाबदारी दिली तर संघाचं नुकसान होणारच. यावेळी त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमवरही सडकून टीका केली. "ज्याला सुपरस्टार म्हटलं जातं, तो एकही सामना जिंकवू शकत नाही. कर्तृत्व शून्य आणि अज्ञानी व्यक्तीला मोठी जबाबदारी देणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे." शोएब अख्तर यांने फक्त क्रिकेट बोर्डातील प्रशासकांवर नाही तर वरिष्ठ खेळाडूंवरही टीका केली. शाहीन आफ्रिदी आणि शादाब खान या अनुभवी खेळाडूंच्या कामगिरीवरही त्याने प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे.
  
टीम इंडियाने नौटंकी बहाद्दर पाकिस्तानची पुन्हा जिरवली!

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघाची घोषणा केल्यावर पाकिस्तानच्या संघाने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची नोंटकी केली. शेवटी आयसीसीसोबतच्या बैठकीनंतर त्यांच्यावर यू टर्न घ्यायची वेळ आली. मैदानात उतरण्याआधीच पराभवाचा सामना करणारा पाकिस्तान संघाने भारताविरुद्ध आपली खरी ताकद असलेल्या जलगती गोलंदाजीतील धार बाजूला ठेवून फिरकीचं अस्त्र आजमावले. पण हा डावही पाकिस्तानला भारताच्या धुरंधरांपासून वाचवू शकला नाही. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील नववा सामना जिंक त भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धचा या स्पर्धेत ८-१ अशी आघाडी भक्कम करत पुन्हा एकदा पाकिस्तानची जिरवी.

Web Title : भारत से हार के बाद अख्तर ने बाबर, नकवी को लताड़ा

Web Summary : टी20 विश्व कप में भारत से पाकिस्तान की हार के बाद शोएब अख्तर ने बाबर आजम और पीसीबी प्रमुख मोहसिन नकवी की आलोचना की। अख्तर ने आजम की कप्तानी और नकवी के क्रिकेट ज्ञान पर सवाल उठाया, और टीम के खराब प्रदर्शन पर प्रकाश डाला।

Web Title : Akhtar slams Babar, Naqvi after Pakistan's loss to India.

Web Summary : Shoaib Akhtar criticized Babar Azam and PCB chief Mohsin Naqvi after Pakistan's defeat to India in the T20 World Cup. Akhtar questioned Azam's captaincy and Naqvi's cricket knowledge, highlighting the team's poor performance and strategic errors.