Pakistan PCB No Handshake Controversy IND vs PAK Asia Cup 2025 : भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तान विरूद्ध सहज विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेकीच्या वेळी आणि सामना संपल्यानंतर, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवनेपाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याच्याशी हस्तांदोलन केले नाही. अहवालानुसार, पाकिस्तानी कर्णधार भारतीय ड्रेसिंग रुमपर्यंत आला पण भारतीय खेळाडूंनी दरवाजा लावून घेतला. घडलेल्या प्रकारावरून अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. तशातच आता यासंदर्भात ताजी अपडेट आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतीय कर्णधाराच्या या वर्तणुकीबाबत अधिकृतरित्या तक्रार करत निषेध नोंदवला आहे.
भारतीय संघाने हस्तांदोलनाबाबत आधीच कळवलं होतं...
सामना संपल्यानंतर खेळभावनेतून प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करणे हा शिष्टाचार मानला जातो. परंतु, भारतीय संघ व्यवस्थापनाने सामना सुरु होण्याआधीच सामनाधिकारी अँडी प्रॉयक्रॉफ्ट यांना माहिती दिली होती की सामन्याआधी किंवा नंतर हस्तांदोलन केले जाणार नाही. त्यानुसार, सामनाधिकाऱ्यांनी टॉसच्या वेळी हस्तांदोलन न करण्याच्या सूचना पाक कर्णधाराला आधीच दिल्या होत्या. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यातील पाकिस्तानचे कनेक्शन आणि नंतर ऑपरेशन सिंदूरदरम्यान जीव गमावलेल्या शहीद भारतीय सैनिकांच्या स्मरणात भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन करणे टाळले. यामुळे पाकिस्तानी संघाचा तीळपापड झाला असून त्यांनी याबाबत पत्रक जारी केले आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या पत्रकात काय?
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या पत्रकात म्हटले आहे की, सामनाधिकारी अँडी प्रॉयक्रॉफ्ट यांनी आधीच कर्णधार सलमान अली आगा या टॉसच्या वेळी हस्तांदोलन करू नये, असे सांगितले होते. त्यावरूनच पाक संघ व्यवस्थापनाने निषेध नोंदवत हा प्रकार खेळभावनेच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. पाक बोर्डाने असेही म्हटले आहे की, कर्णधार सलमानने पोस्ट मॅच प्रेझेंटेशनला उपस्थित न राहणे हा भारतीय संघाचा निषेध नोंदवण्याचा प्रकार होता. कारण मुलाखत घेणाराही भारतीय आहे.
हस्तांदोलन नाकारणे ही शहिदांना श्रद्धांजली
भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने सामना संपल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. त्यात त्याला हस्तांदोलन न करण्याबाबतचा सवाल विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला की, हस्तांदोलन नाकारणे ही खऱ्या अर्थाने पहलगाम हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली होती.
Web Title: IND vs PAK PCB Breaks Silence On No Handshake Controversy Officially Lodges Protest Against India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.