भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी२० वर्ल्डकप २०२६च्या सामन्यात टीम इंडियाने सहज विजय मिळवला. इशान किशनच्या ७७ धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी धुव्वा उडवला. आता क्रिकेटरसिकांना सांगितले की, या विश्वचषकात कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर हे दोघे पुन्हा एकमेकांसमोर येऊ शकतात, तर... कारण एक असे गणित आहे ज्यामुळे याच स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकमेकांसमोर येऊ शकतात. सध्या भारतीय संघ सुपर-८ मध्ये पोहोचला आहे, पण पाकिस्तानने अजूनही सुपर ८ची फेरी गाठलेली नाही. जर दोन्ही संघ सुपर-८ मध्ये गेले तर हा सामना पुन्हा रंगू शकतो.
सुपर-८ गट कसा असू शकतो?
जर पाकिस्तानने नामिबियाविरुद्धचा सामना जिंकला, तर २०२६च्या टी२० विश्वचषकाच्या गट अ मध्ये पॉइंट्स टेबलमध्ये ते दुसऱ्या स्थानावर राहतील आणि सुपर ८ मध्ये स्थान मिळवतील. त्याचप्रमाणे, उर्वरित तीन गटांमधील अव्वल दोन संघ सुपर ८ मध्ये आपले स्थान निश्चित करतील. जर कोणतेही मोठे अपसेट झाले नाहीत तर गट अ मधून भारत आणि पाकिस्तान, गट ब मधून ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका, गट क मधून इंग्लंड आणि वेस्ट इंडिज आणि गट ड मधून न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका सुपर ८ मध्ये स्थान मिळवू शकतात. या परिस्थितीत, दोन सुपर ८ गट खालीलप्रमाणे असू शकतात:
- गट १: भारत, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका
- गट २: इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका
सुपर ८ मध्ये, भारत-पाकिस्तान सामना होणार नाही...
सुपर ८ टप्प्यात, प्रत्येक संघ त्यांच्या स्वतःच्या गटातील प्रत्येक संघाविरुद्ध एक सामना खेळेल. जर सुपर ८ गटात कोणताही बदल झाला नाही तर भारत २२ फेब्रुवारीला आफ्रिकेशी, २६ फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियाशी आणि शेवटचा सामना विंडिजशी खेळेल. त्यात भारत-पाकिस्तान सामना होण्याची शक्यता कमी आहे. पण जर भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ आपापल्या गटातील सामने जिंकून सेमीफायनलमध्ये आले, तर तिथे मात्र ते आमने-सामने येऊ शकतात.
अंतिम सामन्यात आमने-सामने येण्याचीही शक्यता
जर भारत आणि पाकिस्तान आपापल्या गटातून उपांत्य फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाले, तर ते दुसऱ्या सामन्यात आमनेसामने येऊ शकतात. जर भारत गट १ मध्ये अव्वल स्थानावर राहिला आणि उपांत्य फेरीत पोहोचला आणि पाकिस्तान सुपर ८ च्या गट २ मधून उपांत्य फेरीत पोहोचणारा दुसरा संघ असेल, तर ते २०२६च्या टी२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आमनेसामने येऊ शकतात. पण जर भारत आणि पाकिस्तान दोघेही सुपर ८ मध्ये त्यांच्या संबंधित गटात अव्वल स्थानावर राहिले किंवा दुसऱ्या स्थानी राहिले आणि उपांत्य फेरीत विजय मिळवताना दिसले, तर ते अंतिम सामन्यात समोर येतील.