Join us
Daily Top 2Weekly Top 5

"जरा जपून..." IND vs PAK यांच्यातील सामन्याआधी हरभजन सिंगचा टीम इंडियाला सल्ला, म्हणाला...

IND vs PAK हायहोल्टेज सामन्याआधी ड्रामा रंगला, आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 14:22 IST

Open in App

IND vs PAK Harbhajan Singh On Pakistan Spinner Usman Tariq : भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याने पाकिस्तानविरुद्धच्या कोलंबोच्या मैदानात रंगणाऱ्या महामुकाबल्याआधी टीम इंडियाला सावधानतेचा इशारा दिला आहे. हरभजन सिंगने पाकिस्तानी स्पिनर उस्मान तारिकचा खास उल्लेख करत त्याच्या गोलंदाजीवर जपून खेळण्याचा सल्लाही दिला आहे. भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धचा आपला रुबाब कायम राखत कोणत्याही दबावाशिवाय हा सामना जिंकेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

IND vs PAK हायहोल्टेज सामन्याआधी ड्रामा रंगला, आता... भारत-पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज सामना रविवार, १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे. यंदाच्या हंगामासाठी संघाची घोषणा केल्यावर पाकिस्तानी सरकारने आपल्या संघाला भारताविरुद्धच्या या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा  निर्णय घेतला होता. पण आंतरारष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या हस्तक्षेपानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान सरकारला यू टर्न घ्यावा लागला. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी झालेल्या या नौटंकीमुळे यावेळीच्या सामन्यात आणखी रंगत पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.

IRE vs Oman : आयरिश कॅप्टनचं शतक थोडक्यात हुकलं! पण संघाने ओमान विरुद्ध उभारली विक्रमी धावसंख्या

हरभजन सिंगचा टीम इंडियाला सल्ला, म्हणाला...

"पाकिस्तानविरुद्ध भारत सामना जिंकेल. त्यांच्या संघात एक चांगला स्पिनर आहे.  उस्मान तारिक, ज्याच्यासमोर आपल्या संघातील फलंदाजांना काळजीपूर्वक खेळावे लागेल. भारताचा संघ उत्तम आहे आणि मला आशा आहे की, ते या सामन्यातही कोणत्याही दबावाशिवाय खेळतील. भारत या सामन्यात विजयाची पतका फडकावेल."

उस्मान तारिक गोलंदाजी शैलीवरुन वादात

पाकिस्तानच्या ताफ्यातील उस्मान तारिक त्याच्या गोलंदाजी शैलीवरुन चर्चेत आहे. थांबून चेंडू फेकत असल्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला 'फेकी' गोलंदाजाचा टॅग लावला आहे. आयसीसीने मात्र त्याची शैली योग्य असल्याचे स्पष्ट  केले आहे. भारत-पाक सामना हा आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार असून ही खेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल आहे.  भारत-पाकिस्तान सामन्यातही तो एक्स-फॅक्टर मानला जात आहे. भारतीय फलंदाज त्याच्यावर भारी पडतील, अशी आशा आहे.  या गोलंदाजाने आतापर्यंत ४ T20 सामने खेळले असून ११ विकेट्स घेतल्या आहेत.  

English
हिंदी सारांश
Web Title : Harbhajan Singh advises Team India to be cautious against Pakistan.

Web Summary : Harbhajan Singh warned India about Pakistan's spinner Usman Tariq before their match. He advised careful play against Tariq, expressing confidence in India's victory without pressure. The match is scheduled after initial boycott drama.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारत विरुद्ध पाकिस्तानभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ