IND vs PAK Final Rinku Singhs Gods Plan Success : "प्रेमाला उपमा नाही, हे देवा घरचे देणे..." मराठीतील लोकप्रिय गीत तुम्ही ऐकलं असेल. क्रिकेटच्या मैदानात मिळालेलं फेम अन् थेट IND vs PAK यांच्यातील फायनलमध्ये अविस्मरणीय फ्रेममध्ये येण्याची रिंकूला मिळालेली संधी या गाण्याचा एक भाग आहे. हे आम्ही नव्हे खुद्द रिंकून मॅचनंतर बोलून दाखवलंय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिली मॅच, पहिला बॉल अन् मॅच विनिंग स्ट्रोक
संपूर्ण आशिया कप स्पर्धा बाकावर बसून काढलेल्या रिंकू सिंह याची आशिया कपच्या फायनलमध्ये अचानक प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री झाली. निमित्त होतं ते हार्दिक पांड्याचं दुखणं. पाकिस्तानचा संघ १४६ धावांवर आटोपल्यावर त्याच्यावर बॅटिंगची वेळ येईल, असं वाटलंही नव्हतं. पण ती वेळही आली अन् नुसतं स्ट्राइकवर न उभे राहता विनिंग फटका हा त्याच्या भात्यातून आला. पहिली आशिया कप स्पर्धा, फायनलमध्ये पहिली संधी अन् पहिल्या बॉलवर अविश्वसनीय विजय मिळवून देत त्याने हा क्षण खास केला. ही सगळी योजना देवाची होती, असे म्हणत रिंकून आपल्या मनातील भावना बोलून दाखवली.
Asia Cup Winner Indian Captains : सूर्यकुमार यादव थेट MS धोनीच्या पंक्तीत
हे देवा घरचं देणं..
IPL मध्ये शाहरुख खानच्या सह मालकीच्या KKR संघाकडून खेळताना मॅच फिनिशरच्या रुपात स्टार झालेल्या रिंकूला आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळेल, याची आशाच उरली नव्हती. कारण तो खराब फॉर्ममधून जात होता. पण टीम इंडियातून कॉल आला अन् रिंकून UP टी-२० लीगमध्ये तुफान फटकेबाजीसह सुन्या मैफिलीत रंग भरला. फायनलमध्ये चौकार मारून संघाला विजय मिळवून दिल्यावर तो म्हणाला की, मला मॅच फिनिशरच्या रुपात ओळखतात. विनिंग चौकार माझ्या बॅटमधून आला याचा आनंद आहे. जे घडलं ती देवाची कृपा (God's Plan) आहे, ही गोष्टही त्याने बोलून दाखवली.
जे बोलूनं दाखवलं तेच घडलं
God's plan हा रिंकूचा आवडता कोट आहे. हे त्याने टॅटू स्वरुपातही आपल्या हातावरही लिहिलं आहे. देवानं तुमच्यासाठी योजना आखलेली आहे. वाट बघा अन् संधी मिळाल्यावर त्याचं सोनं करा, अशीच गोष्ट रिंकूच्या बाबतीत घडली. God's plan संदर्भातील एक खास गोष्ट आहे. आशिया कप स्पर्धेला सुरुवात होण्याआधी रिंकू सिंह याने स्पोर्ट्स नेटवर्कला एक खास मुलाखत दिली होती. त्यावेळी जेतेदासाठी विजयी धाव मला घ्यायचीये, अशी इच्छा व्यक्त केली होती. देवानं त्याची ही गोष्ट ऐकली अन् तशीच योजना केली, अशा आशयाचे वक्तव्य रिंकून केलं आहे.