BCCI warning to Mohsin Naqvi Asia Cup 2025 Trophy Controversy Update : आशिया चषक स्पर्धा २०२५च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळवला. पण पाकिस्तानचे मंत्री असलेले आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास टीम इंडियाने नकार दिला. त्यामुळे कर्णधार सूर्यकुमार यादवला ट्रॉफी न देता, नक्वी ती ट्रॉफी आणि मेडल्स स्वत:कडे घेऊन गेले. या वादामुळे भारतीय संघाला अद्याप विजेतेपदाची ट्रॉफी मिळालेली नाही. यावरून आज ACC च्या बैठकीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि नक्वी यांच्यात तुफान राडा झाल्याचे सांगितले जात आहे.
BCCIने केली मागणी
BCCIने आज झालेल्या बैठकीत, मोहसीन नक्वी यांच्याकडे विजेतेपदाची ट्रॉफी आणि विजेत्यांची पदके भारतात परत देण्यासाठी आशियाई क्रिकेट परिषदेच्या मुख्यालयात पाठवण्याची मागणी केली आहे. मंगळवारी, ३० सप्टेंबर रोजी दुबई येथे झालेल्या एसीसीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच, नक्वी यांच्या आडमुठ्या वर्तणुकीबाबत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ICC च्या बैठकीत बीसीसीआय नक्वींविरुद्ध औपचारिक तक्रार दाखल करण्याचीही योजना आखत आहे.
मोहसीन नक्वींनी नेली ट्रॉफी, मेडल्स
रविवारी दुबई येथे आशिया कप २०२५ चा अंतिम सामना झाल्यानंतर भारताने नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. वृत्तानुसार, सामन्यानंतरचा बक्षीस वितरण समारंभ एक तास उशिरा झाला, परंतु भारतीय संघ आपल्या निर्णयावर ठाम राहिला. यामुळे मोहसिन नक्वींची फारच नाचक्की झाली. त्यामुळे ते विजेत्या संघाचा सन्मान न करता स्टेडियममधून निघून गेले. याशिवाय, रागाच्या भरात ते ट्रॉफी आणि सर्व पदके सोबत घेऊन गेले. ताज्या वृत्तानुसार, आशिया कप ट्रॉफी आणि खेळाडूंची वैयक्तिक पदके अजूनही दुबईतील मोहसीन नक्वी यांच्या हॉटेल रूममध्येच ठेवण्यात आली आहेत. BCCI इतर आशियाई क्रिकेट बोर्डांसोबत या समस्येचे निराकरण करण्यासाठी काम करत आहे. BCCI ने मोहसीन नक्वी यांना आशिया कप ट्रॉफी दुबई स्पोर्ट्स सिटीमधील एसीसी कार्यालयात पाठवण्यास सांगितले आहे, जिथून ती भारतात घेऊन जाण्यात येईल.
मोहसीन नक्वी अजूनही आडून
BCCI च्या या मागणीनंतरही मोहसीन नक्वी यांनी आडमुठी भूमिका कायम ठेवली आहे. नक्वी अजूनही त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे BCCI त्यांच्याविरुद्ध आणखी कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेऊ शकते.
Web Summary : BCCI demands return of Asia Cup trophy and medals after Pakistan's Mohsin Naqvi refused to hand them over post-victory. Tensions flared at the ACC meeting. BCCI plans formal complaint at ICC.
Web Summary : पाकिस्तान के मोहसिन नकवी द्वारा जीत के बाद एशिया कप ट्रॉफी और पदक सौंपने से इनकार करने के बाद बीसीसीआई ने उनकी वापसी की मांग की। एसीसी की बैठक में तनाव बढ़ गया। बीसीसीआई आईसीसी में औपचारिक शिकायत दर्ज करने की योजना बना रहा है।